नागपूर : दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याला सतत मोबाइलवर गेम खेळण्याची सवय लागली. त्यानंतर नवीन मोबाइलसाठी त्याने आईवडिलांकडे हट्ट धरला. नवीन मोबाइल घेऊन न दिल्यामुळे विद्यार्थ्याने घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही दुर्दैवी घटना नागपूर जिल्ह्यातील उमरेडमध्ये घडली. उत्सव गडबोरीकर (१६, इतवारीपेठ, उमरेड) असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे.

उत्सव हा अभ्यासू होता. तो गेल्या उन्हाळ्यात मोबाइलवर तासनतास राहत होता. त्यामुळे त्याला मोबाईचे वेड लागले. परंतु, आता शाळा लागल्यामुळे त्याला मोबाइल बघण्यासाठी आईवडिल रागावत होते. त्याचे वडील शेतमजूर आहेत. मुलाचे दहावीचे वर्ष असल्याने त्याचे कुटुंबीय त्याला अभ्यासासाठी ओरडत होते. मात्र, तो सतत मोबाइलवर गेम खेळत बसत होता. तो आपल्या आईजवळील मोबाइल सतत वापरायचा. गेल्या तीन दिवसांपासून आईचा मोबाइल बिघडला होता. त्यामुळे उत्सव वारंवार वडिलांना नवीन मोबाइलची मागणी करीत होता. दहावीचे वर्ष असल्याने त्यांनी यासाठी नकार दिला. मोबाइल घेऊन न दिल्यामुळे तो नैराश्यात गेला.

Two rickshaws collided after minor driver lost control of tempo
अल्पवयीन चालकाचे टेम्पोवरील नियंत्रण सुटल्याने दोन रिक्षांना धडक
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
theft who beaten up pedestrian and stole mobile phone is arrested
पादचाऱ्याला मारहाण करुन मोबाइल चोरणारा गजाआड
school boy suicide news
शालेय साहित्य न मिळाल्याने मुलाची आत्महत्या; पित्यानेही संपवले जीवन
Bengaluru Crime News
मुलांना विष पाजलं, स्वत:ही केली आत्महत्या; बंगळुरूत दाम्पत्याचं धक्कादायक कृत्य; मरणापूर्वी लिहिला सविस्तर ईमेल!
Realme 14 Pro 5G Series Launch in India
नवा फोन घ्यायचा विचार करत असाल तर जरा थांबा! रिअलमीचा ‘हा’ स्मार्टफोन भारतात होणार लाँच; थंड तापमानात रंग बदलणार
This hack might help break your phone addiction in just 6 minutes, increase concentration by 68 percent
पालकांनो अवघ्या ६ मिनिटांत सुटेल मुलांचे मोबाईलचे व्यसन; तर एकाग्रता ६८ टक्क्यांनी वाढेल, डॉक्टरांनी सांगितली ट्रिक
Zomato Zepto Swiggy field workers have no legal rights
किती काळ पायदळीच तुडवले जाणार? ‘१० मिनिटांत घरपोच’ देणाऱ्यांचे हक्क

हेही वाचा >>>राष्ट्रवादीच्या नेत्यांना विधान परिषद आमदारकीचे वेध; गोंदिया-भंडारातील इच्छुक सक्रिय

हेही वाचा >>>भंडारा: गोसेखुर्द धरणाची सर्व ३३ दारे उघडली ; आज ऑरेंज अलर्ट

दोन दिवसांपासून तो कुणाशी बोलत नव्हता. शेवटी उत्सवने घरातील लाकडी खांबाला गळफास लावला. मध्यरात्री वडिलांना जाग आल्यानंतर त्यांना मुलगा गळफास लावलेल्या अवस्थेत आढळून आला. याप्रकरणी उमरेड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.

Story img Loader