गोंदिया : छत्तीसगड राज्याच्या बीजापूर जिल्हा वनविभागाने ७ जुलैला बिजापूर येथे वाघाच्या कातडीसह काही आरोपींना अटक केली होती. याप्रकरणाच्या सखोल तपासानंतर आणखी वीस जणांना अटक करण्यात आली. आरोपींनी वाघाची कातडी गोंदिया जिल्ह्याच्या सीमेवरून आणल्याची कबुली दिल्यानंतर सालेकसा तालुक्यातील मुख्य आरोपी आणि आमगाव तालुक्यातील कातडी विकण्यास मदत करणाऱ्या ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा >>> बुलढाण्यात खळबळ! दिल्लीचा गँगस्टर नीरज बवानाच्या नावाने मागितली ४० लाखांची खंडणी, गुन्हा दाखल

Blood purification center, Kama Hospital,
मुंंबई : जी. टी. आणि कामा रुग्णालयातही रक्तशुद्धीकरण केंद्र
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
loksatta Lokshivar fake onion seeds in the market has increased for sale
लोकशिवार: कांद्याच्या बनावट बियाण्यांचा धोका
car during Diwali Important tips
दिवाळीच्या दिवसात फटाक्यांमुळे होऊ शकते तुमच्या गाडीचे नुकसान; सुरक्षेसाठी महत्त्वाच्या टिप्स
Rivers all over the world were drained
जगभरातील नद्यांचे नाले झाले, कारण…
Calf reunited with female leopard,
VIDEO : बछड्यांचे मादी बिबटसोबत पुनर्मिलन
Birds and wildlife near village face extinction gram panchayat is addressing poaching
परप्रांतीय मजुरांच्या शिकारीबद्दल, संबंधित शेतकऱ्यांवरही कारवाई, द्राक्ष बागायतदारांना इशारा
Use of plastic will be dangerous for agriculture
प्लास्टिकचा भस्मासूर शेतांना गिळंकृत करू पाहतोय…

गोंदिया जिल्ह्यात बहुतांश भाग हा जंगलांनी व्यापलेला आहे. या जंगलांमध्ये वाघांसह इतर अनेक प्राण्यांचा वावर आहे. यामुळे वन्यप्राण्यांची शिकार आणि तस्करी करणाऱ्या टोळ्याही येथे सक्रिय आहेत. यापैकी एका टोळीने सालेकसा जंगलातून वाघाची शिकार केली आणि त्याची कातडी, नखे, हाडे आणि मिशीचे केस हे छत्तीसगड राज्यातील बीजापूर येथील सीआरपीएफच्या पोलीस उपनिरीक्षक अमित झा आणि त्यांच्या २० सहकाऱ्यांना विकले. वनविभागाने चौकशी केली असता, शालिक मरकाम (५५, रा. कोसाटोला), सुरज मरकाम (४५, रा. कोसाटोला), जियाराम मरकाम (४२, रा. नवाटोला, सालेकसा) या तिघांनी मिळून विद्युत प्रवाहाद्वारे वाघाची शिकार केल्याची कबुली दिली. यानंतर वाघाची कातडी विकण्यासाठी मदत करणाऱ्या गेदलाल भोयर (५५, रा. लभानधारणी), तुकाराम बघेले (५९, रा. भाडीपार), अंगराज कटरे (६७, रा. दरबडा), वामन फुंडे (६०, रा. सिंधीटोला), शामराव शिवनकर (५३), जितेंद्र पंडित, यादवराव पंधरे, अशोक खोटेले, अशा एकूण ११ आरोपींना अटक करण्यात आली आहे.