अमरावती : तिकीट साठ्यात तफावत दिसून आल्यानंतर या प्रकरणी प्राथमिक चौकशी अहवालात दोषी आढळल्याने राज्‍य परिवहन महामंडळाच्‍या ११ अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना निलंबित करण्‍यात आले आहे. या कारवाईमुळे एसटी महामंडळात खळबळ उडाली आहे.एसटी महामंडळाच्या अमरावती आगारात सन २०१९ ते २०२२ या कालावधीत प्रवाशाच्या तिकीट साठ्यामध्ये तफावत आढळून आली होती. या प्रकरणी विभाग नियंत्रकांनी चौकशीचे आदेश दिले होते. यानुसार विभागीय वाहतूक व लेखाअधिकारी यांच्या पथकाने या प्रकरणाची प्राथमिक चौकशी करून याबाबतचा अहवाल आगार व्यवस्थापकांना सादर केला.

त्यानुसार तिकीट साठा अद्ययावत न ठेवता या कामात हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवून सहायक वाहतूक अधिकारी, तत्कालीन आगार लेखापाल यांच्यासह सहा लिपिक, ३ वाहतूक नियंत्रक अशा अमरावती आगारातील ११ अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एसटी महामंडळाचे उपमहाव्यवस्थापक, विभाग नियंत्रक आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली आहे.

Pimpri Municipal Corporation, transfers officers,
पिंपरी : महापालिकेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या अंतर्गत बदल्या प्रलंबित; बदली धाेरणाच्या अंमलबजावणीस टाळाटाळ?
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
cm devendra fadnavis prohibiting appointments of private secretaries in government offices
खासगी व्यक्तींच्या नियुक्तीस मनाई; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्णयाने मंत्र्यांना धक्का
mpsc result latest marathi news
‘एमपीएससी’च्या समाज कल्याण अधिकारी पदाचा निकाल जाहीर, मात्र केवळ ‘या’ उमेदवारांना मुलाखतीची संधी
Amravati jat panchayat social boycott
धक्कादायक! जात पंचायतीच्या आदेश झुगारला म्हणून सामाजिक बहिष्कार
illegal constructions Mumbai
मुंबई : अनधिकृत बांधकामांवर २०० टक्के दंड, अतिरिक्त आयुक्त अश्विनी जोशी यांचे निर्देश
Contract to supply manpower to Vitthal Rukmini Temple Committee cancelled
विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीला मनुष्यबळ पुरवठा करणारा ठेका रद्द; तक्रारींनंतर मंदिर समितीकडून कारवाई
Thane , non-agricultural tax , notices, Thane citizens,
सरकारने रद्द केलेल्या अकृषिक कराच्या ठाणेकरांना नोटीसा, नोटीसांमुळे नागरिकांमधून व्यक्त होतोय संताप
Story img Loader