अमरावती : चंद्रयान-३ च्या यशानंतर, भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठी आदित्य एल-१ यान प्रक्षेपित केले आहे. या पार्श्वभूमीवर येथील ज्येष्ठ संशोधक डॉ. विजय इंगोले यांनी सूर्याचे ११ उपथर शोधल्याचा दावा केला आहे. ही माहिती आदित्य एल-१ मोहिमेत उपयुक्त ठरेल, असा विश्वास देखील डॉ. इंगोले यांनी व्यक्त केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूर्यावरील उष्णतेमुळे पृथ्वीवरील सजीव सृष्टीला ऊर्जा मिळते. सूर्य हा तप्त वितळलेल्या रसाने बनलेला असून त्यावर एक प्रकाशमानाचा थर आहे. या थराला ‘फोटोस्फियर’ म्हणतात. यामधूनच आपल्याला दिसणारे सप्तरंगी प्रकाश आणि उष्णता बाहेर पडते. यानंतर ‘क्रोमोस्फियर’ हा दुसरा थर असून त्यामधून ‘अल्ट्राव्हायोलेट किरणे’ बाहेर पडतात. त्यानंतर ‘ट्रान्झिशन रिजन’ नावाचा तिसरा थर असून त्यामधून अतिनील किरणे म्हणजेच हाय ‘अल्ट्रावायोलेशन’ बाहेर पडते. शेवटी करोना नावाचा सर्वात जाड थर आहे. या सर्व थरांसंदर्भात ढोबळ मानाने माहिती उपलब्ध आहे. परंतु ‘ट्रान्झिशन’ थराबाबत पूर्ण माहिती उपलब्ध नाही. यासंदर्भात संशोधक डॉ. इंगोले यांनी गेल्या अनेक वर्षांसून सूर्य आणि त्याच्या बाह्य थरांविषयी संशोधन केले असून या संशोधनात ‘ट्रानसिशन रिजन’मध्ये तब्बल ८ उपथर आढळून आल्याचा डॉ. इंगोले यांचा दावा आहे.

हेही वाचा >>> Jalna Lathi Charge : न्यायालयीन चौकशीचे मुख्यमंत्र्यांचे संकेत; पोलीस अधीक्षक सक्तीच्या रजेवर

सूर्याच्या सर्व मुख्य चारही थरांमध्ये प्रकाशमानात बदल होताना दिसतो. सूर्याच्या अगदी जवळ असणारा फोटोस्फियर हा थर सुमारे ४०० ते ५०० किलोमीटपर्यंत पसरला आहे. त्यानंतर सुमारे ७५० किलोमीटर पर्यंत मोठी पोकळी अर्थात ‘डेड झोन’ आहे. त्यानंतर ‘क्रोमोस्फियर’ हा थर असून तो सुमारे एक ते तीन हजार किलोमीटर रुंद आहे. त्यानंतर ‘ट्रान्झिशन रिजन’ हा सुमारे एक ते साडेतीन हजार किलोमीटर रुंद थर आहे. यानंतर पुन्हा पाचशे किलोमीटर रुंद मोठी पोकळी आहे.

हेही वाचा >>> मराठा आरक्षणावर चर्चा करण्यासाठी शंभूराज देसाईंनी घेतली उदयनराजेंची भेट

सूर्याबद्दल आजवर झालेल्या अभ्यासात फोटोस्फियर, क्रोमोस्फियर, ट्रान्झिशन रिजन आणि करोना या चार थरांविषयी माहिती होती. मात्र गेल्या खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी डॉ. इंगोले यांचेकडे उपलब्ध असलेल्या उपकरणांच्या सहाय्याने त्यांनी सूर्यग्रहणाचे निरीक्षण केले. सूर्यग्रहण लागण्यापूर्वी तसेच सूर्यग्रहण लागल्यानंतर आणि ते सुटल्यानंतर सूर्यप्रकाशातील सूक्ष्म बदल त्यांनी नोंदविले. त्याचा अभ्यास करून विश्लेषण केले. सूर्याच्या सर्व थरांच्या जाडीचे गणित उपलब्ध असलेल्या माहितीशी जुळवून पाहिले असता आश्चर्यकारक परिणाम दिसून आले. क्रोमोस्फियर थराच्या आत तीन उपथर आढळून आले आहेत. तसेच ट्रान्झिशन रिजन या थरामध्ये एकूण आठ उपथर आढळून आले आहेत. सूर्यासंदर्भात ही माहिती अतिशय नवीन असून ती डॉ. इंगोले यांनी इस्रोला पाठवली आहे. आदित्य एल-१ उपग्रह माहिमेत ती उपयुक्त ठरेल, असा विश्वास डॉ. इंगोले यांनी व्यक्त केला आहे.