गडचिरोली : नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी नक्षलवादी चळवळीला मोठा हादरा बसला. मागील ३८ वर्षापासून नक्षल चळवळीत सक्रिय असलेली जहाल नक्षलवादी, दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य आणि नक्षल्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची पत्नी विमला सिडाम उर्फ तारक्का हिच्यासह ११ नक्षलवाद्यांनी बुधवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पोलिसांपुढे आत्मसमर्पण केले. त्यात १ डीकेएसझेडसीएम, ३ डीव्हीसीएम, २ एसीएम व ४ दलम सदस्यांचा समावेश आहे. या सर्वांवर एकूण ८६ लाख ५ हजार रुपयांचे बक्षीस होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षल्यांना संविधानाची प्रत देऊन त्यांचा सत्कार केला.

हेही वाचा >>> नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील वनाधिकाऱ्यांची दंडुकेशाही; कारवाईच्या नावावर शिवभक्तांकडून अवैध वसुली

Namdev Shastri Maharaj kirtan on Bhandara mountain postponed
पिंपरी : नामदेव महाराज शास्त्री यांचे भंडारा डोंगरावरील कीर्तन रद्द
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
Narendra Modi on foreign meddling
Narendra Modi : “गेल्या १० वर्षांतील हे पहिलेच अधिवेशन, ज्यात…”; विदेशी हस्तक्षेपावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांना टोला!
Image Of Ajit Pawar
Ajit Pawar : “मी काही साधू संत नाही”, बीडमधून अजित पवार यांचा कोणाला इशारा?
Uttarakhand UCC portal marriage registrations
Uttarakhand UCC: समान नागरी कायदा लागू झाल्यानंतर उत्तराखंडमध्ये विवाह नोंदणी कशापद्धतीने सुरू आहे?
Reliance Jio Republic Day Offer 2025
Republic Day Offer 2025 : अशी भन्नाट ऑफर शोधून सापडणार नाही! फक्त एकदा करा रिचार्ज आणि मिळवा भरपूर कूपन
Ajit Pawar On Mahayuti Politics
Ajit Pawar : राज्याला तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार? संजय राऊतांच्या दाव्यावर अजित पवारांचं चार शब्दांत उत्तर; म्हणाले…
Sanjay Raut On BJP
Sanjay Raut : “लक्षात घ्या, राजकारणात सर्वांचे दिवस येतात”, संजय राऊतांचा अमित शाह, एकनाथ शिंदेंना मोठा इशारा

दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तारक्का ही मागील ३८ वर्षापासून नक्षल चळवळीत होती. नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य भूपती याची ती पत्नी आहे. तिच्यावर २५ लाख रुपयांचे बक्षीस होते. विमला चंद्रा सिडाम उर्फ तारक्का उर्फ वत्सला उर्फ तारा डीकेएसझेडसीएम, सुरेश उईके उर्फ चैतू उर्फ बोटी, डीव्हीसीम कुतुल एरिया कमिटी व त्याची पत्नी कल्पना गणपती तोर्रेम उर्फ भारती उर्फ मदनी (डीव्हीसीएम), अर्जुन तानू हिचामी उर्फ सागर उर्फ सुरेश डीव्हीसीएम राही दलम व त्याची पत्नी सम्भ पांडू मट्टामी उर्फ बंडी (एसीएम डी. के. झोन डॉक्टर टीम), वनिता सुकलू धुर्वे उर्फ सुशीला (एसीएम भामरागड दलम), निशा बोडका हेडो उर्फ शांती उपकमांडर पेरमिली दलम, श्रुती उलगे हेडो उर्फ मन्ना, सदस्य कंपनी क्रमांक १०, शशिकला पतीराम धुर्वे पश्चिम सबझोनल प्रेस टीम सदस्य, सोनी सुक्कू मट्टामी राही दलम सदस्य, आकाश सोमा पुंगाटी उर्फ वत्ते सदस्य प्लाटून नंबर ३२ यांचा आत्मसमर्पण करणाऱ्यांमध्ये समावेश आहे.

हेही वाचा >>> गडचिरोलीच्या विकासाचे नवे पर्व सुरू…. मुख्यमंत्र्यांच्या दाव्याने…..

संविधानविरोधी आणि देशविरोधी कृत्यामुळे आपला विकास होत नाही, हे नक्षलवाद्यांच्या लक्षात आल्यामुळे अनेक जण देशाची व्यवस्था आणि संविधानावर विश्वास ठेवून मुख्य प्रवाहात येत आहेत, असे फडणवीस म्हणाले. जिल्हा प्रशासन आणि पोलीस विभाग करीत असलेल्या विकासकामांमुळे मागील चार वर्षात नक्षल चळवळीत एकही नवीन भरती झाली नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. याप्रसंगी विविध चकमकींमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणारे पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सत्कार करण्यात आला.

कोण आहे तारक्का?

६२ वर्षीय तारक्का नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटीची सदस्य तसेच दंडकारण्य विभागाच्या वैद्यकीय पथकाची प्रमुख होती. अहेरी तालुक्यातील किष्टापूर येथील मूळ रहिवासी असलेली तारक्का ही मागील ३८ वर्षांपासून नक्षल चळवळीत सक्रिय होती. तिची प्रचंड दहशत होती. अनेक चकमकी आणि खुनांमध्ये तिचा सहभाग होता.

लाहेरी-मलमपोडूर चकमकीचे नेतृत्व

८ नोव्हेंबर २०१० रोजी लाहेरी-मलमपोडूर गावांमध्ये झालेल्या चकमकीत १७ पोलीस शहीद झाले होते. या चकमकीचे नेतृत्व तारक्काने केले होते. शिवाय त्याची चित्रफितही तिने प्रसारित केली होती. या चकमकीच्या वेळी नक्षलवाद्यांनी सामान्य महिला व पुरुषांच्या वेशभूषेत पाने तोडत असल्याचे भासवून पोलिसांवर हल्ला केला होता. भामरागड आणि एटापल्ली तालुक्यातील दुर्गम गावांमधील आदिवासींमध्ये तारक्का सामान्य महिलेसारखी वावरत असे. त्यामुळे तिच्यावर कुणी संशयही घेत नसे. परंतु वय वाढल्याने मागील काही वर्षांपासून ती अबुजमाडमध्ये वास्तव्यास होती.

Story img Loader