चंद्रपूर : गोंडपिपरी तालुक्यातील चेक बोरगाव जिल्हा परिषद शाळेतील ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. वडोली मार्गावरील ‘इको पार्क’मध्ये गेलेल्या सहलीत ५२ विद्यार्थी होते. पार्कमध्ये विद्यार्थ्यांनी ‘ब्रॉयलर चिकन’ खाल्ले. यातून ११ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. विषबाधा झालेल्या विद्यार्थ्यांना ग्रामीण रुग्णलयात दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> स्वतंत्रने नागपुरात येऊन स्विटीला ‘स्वतंत्र’ केले खरे, पण…

शिक्षकांनी सहलीबाबत विद्यार्थ्यांच्या पालकांना माहितीच दिली नव्हती. यामुळे संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले आहे. समीरा वेलादी, संस्कार झाडे, रवली शेंडे, आरती आत्राम, टिना बोरकुटे, खुशाल बोरकुटे, भारत झाडे, रुद्रमनी वेलादी, क्रिश वेलादी, आदित्य वेलादी, दिपक भोयर, या विद्यार्थ्यांवर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. चेक बोरगाव जिल्हा परिषदेतील शाळेतील शिक्षकांनी निसर्गरम्य ठिकाणावर विद्यार्थ्यांची सहल नेली. सहलीदरम्यान शाकाहारी अन्न विद्यार्थ्यांना खाऊ घालायला हवे होते. मात्र, शिक्षकांनी चक्क ‘चिकन’ आणले. ते खाल्ल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांना मळमळ आणि उलट्या सुरू झाल्या. मुख्याध्यापकांना याबाबत विचारणा केली असता ते म्हणाले, विद्यार्थ्यांची ‘चिकन’ खाण्याची इच्छा होती. मुलांनी जेवण केले आणि त्यानंतर ते गोल फिरणाऱ्या चक्रीवर बसले. त्यामुळे त्यांना मळमळ होऊन उलट्या सुरू झाल्या. मुलांची प्रकुती सध्या ठीक असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणाची तत्काळ चौकशी करून अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांना दिल्या आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 11 students from zilla parishad school suffer from food poisoning after consuming broiler chicken rsj 74 zws
Show comments