बुलढाणा : जिल्ह्यातील खामगाव व संग्रामपूर येथील न्यायालयाचे रुपडे पालटणार आहे. याचे कारण या न्यायालयाच्या बांधकामासाठी तब्बल ११७ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. राज्य शासनाच्या विधी व न्याय विभागाने हा निधी मंजूर केला आहे.

उच्च न्यायालयाने राज्य शासनाकडे ही मागणी केली होती. तसेच दोन्ही वकील संघ तसेच आमदारद्वय आकाश फुंडकर व संजय कुटे यांनी पाठपुरावा केला. खामगावसाठी ८९ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला असून सध्याची इमारत पाडून नवी इमारत उभारण्यात येणार आहे. नवीन इमारतीत तळमजला व चार मजले आणि १२ ‘कोर्ट हॉल’ राहणार आहे. अनेक वर्षांपासून भाड्याच्या जागेत असलेल्या संग्रामपूर न्यायालयाला लवकरच हक्काची इमारत मिळणार आहे. तिथे तळमजला व ३ मजले आणि ‘२ कोर्ट हॉल’ चे नियोजन आहे.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
china lithium found concern in india
भारतासाठी धोक्याची घंटा? चीनमध्ये सापडला लिथियमचा मोठा साठा,…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
Story img Loader