चंद्रपूर : अठरावी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक चंद्रपूर क्षेत्रात ईतिहास घडविणारी ठरली आहे. या लोकसभा निर्वाचन क्षेत्रात पहिल्या टप्प्यात १९ एप्रिल रोजी मतदान प्रक्रिया पार पडली.निवडणूक निकाल ४ जून रोजी घोषित करण्यात आला.

या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार आमदार प्रतिभा धानोरकर २ लाख ६० हजार ४०६ मताधिक्याने प्रतिस्पर्धी उमेदवारावर विजय प्राप्त केला. राज्याचे वने, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या लोकसभा निवडणूक दरम्यान तिसऱ्यांदा पराभव पत्करावा लागला आहे. यावर्षीच्या लोकसभा निवडणूक निकालातून तेरा निवडणुकीतील उमेदवारांना अनामत रक्कम जप्त करण्याची पाळी ओढवली आहे. यातील बारा उमेदवारांना नोटाच्या पेक्षा कमी मते मिळाल्याचे निवडणूक निकालातून दिसून येत आहे.

chaos in badlapur thane over bjp candidate selection
ठाणे, बदलापुरात गोंधळ; ठाण्यात प्रक्रियेवर आक्षेप, तर निरीक्षकांसमोरच बदलापुरात वाद
aarya jadhao missing in Bigg boss marathi reunion
Bigg Boss Marathi 5: सर्व एलिमिनेटेड सदस्यांची घरात…
bjp flag
भाजपमध्ये उमेदवारीसाठी चिठ्ठ्यांचा खेळ !
possibility of a rift in the Mahavikas Aghadi over the Gondia Assembly Constituency
पक्षश्रेष्ठींचा आशीर्वाद अन् दोघेही बाशिंग बांधून तयार, पण सुमंगल कोणाचे? गोंदियावरून आघाडीत तिढा!
The ruling Shinde Pawar group and the Thackeray group also demand that the polls be held in a single phase
एकाच टप्प्यात मतदान घ्या! सत्ताधारी शिंदे, पवार गटासह ठाकरे गटाचीही मागणी; भाजप, काँग्रेसचे मात्र मौन
Remove Director General of Police Rashmi Shukla Congress demand to Election Commission print politics news
पोलीस महासंचालक रश्मी शुक्लांना हटवा; काँग्रेसची निवडणूक आयोगाकडे मागणी
mla bhimrao tapkir strong contender in khadakwasla constituency
कारण राजकारण : भाजपकडून खडकवासला मतदारसंघ अजित पवारांना?
Who is WWE Wrestler Kavita Dalal Julana Assembly seat election
Vinesh Phogat vs Kavita Dalal: विनेश फोगटच्या विरोधात उतरली सलवार सूटमधील कुस्तीपटू; निवडणुकीच्या आखाड्यात कुणाचा विजय?

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीत एकूण १५ उमेदवारांनी नशीब आजमावले.यामध्ये एकूण मतदारापैकी १२ लाख ४१ हजार ८२८ मतदारांनी मताधिकाराचा हक्क १९ एप्रिल रोजी पार पाडला. यापैकी १० हजार ८४३ मतदारांनी नोटाला पसंती देऊन मतदान केले. मात्र निवडणुकीतील १२ उमेदवारांना नोटापेक्षा कमी मते मिळाल्याचे निवडणूक निकालात दिसून आले आहे. हे या निवडणूक निकालाचे वैशिष्टय ठरले आहे.यामध्ये बहुजन समाज पार्टी चे उमेदवार राजेंद्र रामटेके यांना ९ हजार १८८ मते,अवचित सायाम यांना १ हजार ९०५ मते,अशोक राठोड यांना १ हजार ६७० मते,नामदेव शेडमाके यांना २ हजार २५८ मते,पौर्णिमा घोनमोडे यांना ९७३ मते,वनिता राऊत यांना १०५७ मते,विकास लसंते १५२० मते,विद्यासागर कसर्लावार यांना १४२८ मते,सेवकदास बरके यांना १९९८ मते,दिवाकर उराडे यांना ३ हजार २२४ मते,मिलिंद दहिवले यांना १७६१ मते तर संजय गावंडे यांना ५०८८ मते मिळाली.या १२ उमेदवारांनी नोटाच्या १० हजार ५४३ मतांच्या तुलनेत कमी मते प्राप्त केली आहे.

हेही वाचा >>> चंद्रपूर: कोळसा वाहतूक करणाऱ्या ट्रकची दुचाकीला धडक, भीषण अपघातात दोघांचा मृत्यू

चंद्रपूर लोकसभा निवडणुकीतील एकूण १५ उमेदवारांपैकी काँग्रेसच्या विजयी उमेदवार प्रतिभा धानोरकर व भाजपचे पराभूत उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना वगळून अन्य १३ उमेदवारांवर अनामत रक्कम जप्त करण्याची वेळ मतदारांनी आणली आहे. यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे राजेश बेले व बहुजन समाज पार्टीचे राजेंद्र रामटेके यांच्यासह १३ उमेदवारांचा समावेश आहे. राज्याचे वने ,सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी यंदा तिसऱ्यांदा लोकसभा निवडणुकीला समोरे गेले.मात्र तिन्ही लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत त्यांना प्रतिस्पर्धी उमेदवारांकडून पराभव पत्करावा लागल्याचा ईतिहास घडला आहे.

हेही वाचा >>> अमरावती : ‘इव्हीएम’वरील बटन दाबताना चित्रफित काढणे भोवले

सुधीर मुनगंटीवार यांनी पहिल्यांदा १९८९ मध्ये चंद्रपूर लोकसभा निर्वाचन क्षेत्रातून निवडणूक लढली होती.त्यावेळी काँग्रेसचे उमेदवार शांताराम पोटदुखे यांना २ लाख ४३ हजार ८५४ मते,तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना १ लाख ९३ हजार ३९७ मते मिळाली होती. १९९१ लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत त्यांनी तिसऱ्या क्रमांकाचे मते प्राप्त केली होती.या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार शांताराम पोटदुखे यांना २ लाख १२ हजार ९४८ मते, जनता दलाचे उमेदवार ॲड.मोरेश्वर टेभूर्डे यांना १ लाख २५ हजार २५१ मते ,तर भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना १ लाख २३ हजार १२२ मते मिळाली होती.यावर्षी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैली मुळे दिल्ली गाठण्याची संधी जवळ आली होती. मात्र, काँग्रेसच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांचा मार्ग रोखला.या निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रतिभा धानोरकर यांना ७ लाख १८ हजार ४१० मते प्राप्त करून महायुतीचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांना ४ लाख ५८ हजार ४ मते घेऊन समाधान मानावे लागले. त्यांचा २ लाख ६० हजार ४०६ मतांच्या फरकाने पराभव झाला.