चंद्रपूर : ताडोबा जंगल सफारीसाठी ऑनलाइन बुकिंगच्या नावाखाली सरकारची १२ कोटींहून अधिकची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या संदर्भात रामनगर पोलिसांनी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन आरोपींविरुद्ध बनावट कागदपत्रे तयार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. हे दोन्ही आरोपी शहरातील उच्चभ्रू कुटुंबातील आहेत. या कारवाईमुळे खळबळ उडाली आहे.

ताडोबा अंधारी अभयारण्याचे विभागीय वन अधिकारी सचिन उत्तम शिंदे यांच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. प्राप्त माहितीनुसार, ताडोबा जंगल सफारीसाठी चंद्रपूर वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन नावाच्या कंपनीमध्ये ताडोबा अंधारी टायगर प्रोजेक्ट प्रमोशन फाउंडेशनचे कार्यकारी संचालक यांच्यासोबत करार करण्यात आला. ही कंपनी चंद्रपूर येथील गुरुद्वारा रोड येथील अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर या दोन भावांची आहे.

Cyber ​​criminals cheated the people of Nagpur of Rs 141 crore
सायबर गुन्हेगारांनी नागपूरकरांना घातला १४१ कोटींचा गंडा, १३ हजारांवर तक्रारी
Walmik Karad Surrender Case
वाल्मिक कराड ज्या गाडीतून शरण आला त्या गाडीच्या…
Bajrang Sonavane Demand
Bajrang Sonavane : “अजित पवारांनी बीडचं पालकमंत्रिपद घ्यावं, त्यांना अंधारात कोण काय…”, बजरंग सोनावणेंची मागणी
tiger seen sitting on elephant shocking video viral
भयंकर घटना! वाघाला पकडून हत्तीवर बांधले अन् पुढे केलं असं काही की…, धक्कादायक VIDEO पाहून लोकांचा राग अनावर
nitin Gadkari fraud loksatta,
नितीन गडकरी यांच्या नावाने १० सराफा व्यावसायिकांची फसवणूक; तोतया सुरक्षा अधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा
Suspension of police, police indecent behaviour with girl,
पुणे : अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याचे निलंबन
teacher lost 20 lakh rupees share market
शिक्षकाला वीस लाखांचा गंडा, सुरतचे तीन आरोपी गजाआड; बुलढाणा सायबरची कारवाई
mcoca action against Chuha Gang, Pune, Chuha Gang,
पुणे : दहशत माजविणार्‍या ‘चूहा गँग’वर मोक्का कारवाई, आंबेगाव पोलिसांची कारवाई

हेही वाचा – तलाठ्यांनो, नव्या भरतीपर्यंत उपस्थितीचे वेळापत्रक लावा, शासनाचा आदेश

या करारानुसार, ही कंपनी ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात कमिशनच्या आधारावर ऑनलाइन सफारी बुकिंग करू शकते. २०२० ते २०२३ या कालावधीत या कंपनीला केलेल्या बुकिंग अंतर्गत २२ कोटी २० लाख एवढी रक्कम ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प प्रमोशन फाउंडेशनकडे जमा करायची होती, मात्र या कंपनीने केवळ १० कोटी जमा केल्याचा आरोप तक्रारदाराने केला आहे. विशेष म्हणजे कंपनीने ताडोबा व्यवस्थापनाला १२ कोटी १५ लाख ५० हजारांनी गंडा घातला आहे. चार वर्षांच्या लेखापरीक्षणानंतर ही बाब समोर आली. सरकारी पैशांची उधळपट्टी झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर वनविभागाच्या वतीने विभागीय वन अधिकारी सचिन शिंदे यांनी दोन्ही कंपन्यांविरुद्ध रामनगर पोलिसात तक्रार दाखल केली.

हेही वाचा – नागपूर : कन्हान नदीत बुडालेल्या दोघांचे मृतदेह सापडले, दोघांचा शोध सुरू

पोलिसांनी अभिषेक विनोदकुमार ठाकूर आणि रोहित विनोदकुमार ठाकूर यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हे दोघेही उच्चभ्रू कुटुंब असलेल्या चंद्रपूर येथील गुरुद्वारा रोड येथील प्लॉट क्रमांक ६४ येथील रहिवासी आहेत. या संदर्भात ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे संचकल डॉ. जितेन्द्र रामगावकर यांना विचारले असता प्रकरण न्यायालयात आहे. तरीही वाईल्ड कनेक्टिव्हिटी सोल्युशन या कंपनी विरुद्ध कारवाई करणार असल्याची माहिती दिली.

Story img Loader