वाशीम :  नागपूरहून पुण्याकडे जाणाऱ्या खासगी बसने चालत्या टँकरला मागील बाजूने धडक दिली. रात्रीची वेळ असल्याने प्रवासी गाढ झोपेत असताना वरील बर्थ वरून खालच्या बर्थवर कोसळले. सुदैवाने यामधे जीवितहानी टळली असली तरी १२ जण गंभीर जखमी झाले. ही घटना समृद्धी महामार्गावर वाशीम जिल्ह्यातील लोकेशन १६४ जवळ घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> विद्यार्थ्यांचे आधार कार्ड सलग्न करण्याचे काम संथ, राज्यातील ‘या’ जिल्ह्यावर ठेवला ठपका

गत काही दिवसापासून समृध्दी महामार्गावर अपघाताचे सत्र सुरूच आहे. नागपूरकडून पुण्याकडे खासगी बस जात असताना चालत्या टँकरला मागून धडकली. रात्रीची वेळ असल्याने प्रवाशी गाढ झोपेत असताना हा अपघात झाला सुदैवाने यामधे कुठलीही जीवितहानी झाली नसली तरी यामधे हर्षल रामदास पाटील ४१ वर्षे, योगिता गणेश भुते ४७ वर्षे,  कुणाल सुनील भोजने २० वर्षे, अश्विन विलास मोरकर २४ वर्षे, मोनाली गाडेकर ४२ वर्षे, राकेश बुते ३८ वर्षे, सायली धाडवे ४२ वर्षे, नवनाथ मोहिते ४२ वर्षे, अभिषेक वानखडे ४० वर्षे, मंजू योगेश बुते ४० वर्षे, वैष्णवी काळे २४ वर्षे,  सुमित सावितकर ४५ वर्षे, रा. नागपूर अशी जखमीचे नावे असून जखमींवर कारंजा येथील उपजिल्हा रुग्णालय येथे प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी अमरावती येथे दाखल करण्यात आले आहे.

हेही वाचा >>> सासू-सासरे सोबत नको म्हणणाऱ्या सुनेला उच्च न्यायालयाची चपराक

अखेर चालकाला बाहेर काढले ! टँकर आणि खासगी बसचा अपघात एवढा भीषण होता की, खासगी बसचा चालक हा ट्रक आणि खासगी बसच्या केबिनमध्ये अडकून पडला होता. समृद्धी अग्निशामक दल व १०८ पायलट आणि श्री गुरु मंदिर रुग्णवाहिकेचे रुग्णसेवक रमेश देशमुख यांनी तब्बल अर्धा ते पाऊण तास प्रयत्न करून चालकास बाहेर बाहेर काढले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 12 passengers injured as private bus collided with tanker on samruddhi highway pbk 85 zws