चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथे आलापल्ली-चंद्रपूर मार्गावरील वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर लोहखनिज वाहतूक करणाऱ्या ट्रकच्या चाकाखाली चिरडून बारा वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात रविवारी(ता. १४) दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडला. सोनाक्षी मसराम (१२ रा. नांदगाव फाटा ता. राजुरा जि.चंद्रपूर) असे मृतक मुलीचे नाव आहे. 

हेही वाचा >>> नागपूर: विमानतळावरील रेल्वे तिकीट विक्री केंद्राची झडती

2 killed as auto overturn in khed taluka
मरकळ येथे रिक्षा उलटून दोघांचा मृत्यू
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
GBS Guillain Barre Syndrome suspected patient Karad
कराडमध्ये सापडला जीबीएसचा रुग्ण?
leopard cub , leopard , Katol taluka,
VIDEO : दुरावलेल्या आई-पिल्लाची २४ तासानंतर भेट
Crime News
Crime News : TikTok वर व्हिडीओ पोस्ट करण्यावरून पोटच्या १५ वर्षीय मुलीचं ‘ऑनर किलिंग’; US मधून पाकिस्तानात परतल्यानंतर बापाने घातल्या गोळ्या
Bihar Class 10 Girl Accident
घराच्या छतावर अभ्यास करणाऱ्या मुलीला माकडाने दिला धक्का, खाली पडून १० वीतल्या मुलीचा मृत्यू
Ankit Barai 20 year old youth died in an explosion at an ordnance factory Calling boy to come back father fainted
स्फोटात गमावलेल्या मुलाला परत ये…ची हाक देत वडील बेशुद्ध… बहिणीचे तर अश्रूच गोठले….
Minor girl files rape case against father for refusing to marry boy she likes
नागपूर : मुलीचा चक्क वडिलांवर बलात्काराचा आरोप, कारण वाचून बसेल धक्का…

 आज दुपारी मृतक मुलगी आपल्या मामासोबत दुचाकिने आष्टीवरून गोंडपिपरीकडे जात होती. रस्त्याचे बांधकाम सुरू असल्याने वनविभागाच्या तपासणी नाक्यासमोर दुचाकी घसरली. यात दुचाकीवरून मृतक मुलगी आणि तिचा मामा खाली पडले. एवढ्यात मागून येणाऱ्या ट्रकने सोनाक्षीला चिरडले. अपघातानंतर ट्रकचालक वाहनासह फरार झाला. सदर ट्रक हा सूरजागड येथून लोह खनिजाची वाहतूक करणारा असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करून पुढील कारवाई सुरू केली आहे. फरार ट्रकचालकाचा पत्ता लागला असून त्याला लवकरच ताब्यात घेण्यात येईल, अशी माहिती आष्टीचे पोलीस निरीक्षक कुंदन गावडे यांनी दिली. मागील दीड वर्षांपासून या मार्गावर सूरजागड येथून लोहखनिज वाहतूक करणाऱ्या अवजड वाहनांची रेलचेल असते. त्यामुळे या मार्गावर कायम अपघात होत असतात. तरीही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याने नागरिकांमधून रोष व्यक्त होत आहे.

Story img Loader