लोकसत्ता टीम

अकोला : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम व राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमात जिल्ह्यात कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोध मोहीम २० नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत राबविण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील १३ लाख ८३ हजार २९४ नागरिकांची कुष्ठरोग व क्षयरोगाची तपासणी करण्याचे नियोजन असून, त्यासाठी एक हजार ४२ पथके नियुक्त करण्यात आली आहेत. याबाबत जिल्हा समन्वय समितीची सभा मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी बी. यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे, सहाय्यक संचालक आरोग्य सेवा डॉ. दिलीप रणमले, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.मनिष शर्मा उपस्थित होते.

आणखी वाचा-यवतमाळ : धक्कादायक! शासकीय वाहनाने शाळकरी विद्यार्थिनीचा पाठलाग

मोहिमेत सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचारी व पर्यवेक्षक यांच्या प्रशिक्षणावर भर द्यावा. जास्तीस जास्त कुष्ठरुग्ण व क्षयरुग्ण शोधून त्यांना त्वरित उपचाराखाली आणावे, असे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी वैष्णवी यांनी दिले. मोहिमकाळात नागरिकांनी कुष्ठरोग व क्षयरोगाबाबत तपासणी करून घ्यावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Story img Loader