अमरावती : अर्धवेळ नोकरीच्‍या नावावर एका तरुणाची १३ लाख ७ हजार ९९९ रुपयांची फसवणूक करण्‍यात आली. या प्रकरणी तरुणाच्या तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

गाडगेनगर ठाण्याच्या हद्दीतील रहिवासी एका ३० वर्षीय तरुणाला १० ऑक्टोबर रोजी समाज माध्‍यमावर श्रूती नावाच्‍या वापरकर्त्‍याकडून घरबसल्‍या ऑनलाईन अर्धवेळ नोकरीची संधी असल्‍याचा संदेश प्राप्‍त झाला. विमान तिकीट बुकिंग व रेटींग करण्यासाठी घरबसल्या चांगला मोबदला देण्याची बतावणी ठकसेनाकडून करण्यात आली. त्यानुसार, तरुणाने रेटींग दिले. त्याचवेळी अधिक मोबदल्यासाठी तरुणाला टास्क खेळण्यास प्रवृत्त करण्यात आले. त्यापोटी त्याच्या खात्यात काही रक्कमदेखील आली. त्यानंतर त्याला अनेक टास्क देऊन वेगवेगळ्या खात्यामध्ये पैसे भरण्यास भाग पाडण्यात आले. अशारितीने तरुणाची तब्बल १३ लाख ७ हजार ७९९ रुपयांची फसवणूक करण्यात आली.

हेही वाचा – गोंदिया : आश्रमशाळेत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या मुख्याध्यापकाला अटक, २१ पर्यंत न्यायालयीन कोठडी

हेही वाचा – मुंबई उच्च न्यायालयाचे ‘टेलिग्राम चॅनल’; कारवाईबाबतची माहिती प्रसारित केली जाणार

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तरुणाने सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली. तक्रारीवरून अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 13 lakh fraud with a youth in the name of part time job mma 73 ssb