गोंदिया : गोंदिया वैद्यकीय महाविद्यालयात आठवडाभरात १३ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. हे मृत्यू अपघात, आकस्मिक कारणांनी झाल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला आहे.
याबाबत वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता कुससुमाग्रज घोरपडे म्हणाले, जिल्हाभरातून अनेक व्यक्ती उपचारासाठी येथील वैद्यकीय महाविद्यालयात येत असतात. अपघात, आकस्मिक मृत्यूसह इतर अनेक कारणांमुळे मागील आठवड्यात मृत्यूसंख्या वाढली.
हेही वाचा >>>गडचिरोली पोलीस दलातील ३३ जवानांना ‘राष्ट्रपती पोलीस शौर्य’ पदक
मागील सात ते आठ दिवसात सर्पदंशामुळे २, विषबाधेने २, किडनी आजाराचे ४, अपघातात ३, ट्रेन समोर उडी मारल्याने १ महीला, गंभीर आजारामुळे १, अशा एकूण १३ लोकांचा मृत्यू झाला आहे. -कुससुमाग्रज घोरपडे, अधिष्ठाता, वैद्यकीय महाविद्यालय