लोकसत्ता टीम

यवतमाळ : शाळा सुटल्यानंतर घरी परतत असलेल्या विद्यार्थ्यांचा ऑटो उलटून १३ विद्यार्थी जखमी झाले. हा अपघात राळेगाव -आष्टा मार्गावर गुरुवारी सायंकाळी झाला. हे सर्व विद्यार्थी राळेगाव येथील न्यू इंग्लिश हायस्कूलमधील आहेत.

Boys dance on nach re mora ambyahya vanat song at school get together function funny video goes viral
“नाच रे मोरा आंब्याच्या वनात” गेट दुगेदरला शाळेतल्या जुन्या मित्रांनी केला भन्नाट डान्स; VIDEO पाहून पोट धरुन हसाल
sunlight vitamin d
सूर्यप्रकाश भरपूर प्रमाणात असूनही भारतीयांमध्ये ‘Vitamin D’ची कमतरता…
youth died on the spot in an accident today on Buldhana Chikhali state highway
स्कूलबस आणि दुचाकीची धडक, युवकाचा मृत्यू; चिखली राज्य मार्गावरील घटना
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
seven killed 43 injured in kurla bus accident
कुर्ला बस अपघातात ४३ जखमी, सात जणांचा मृत्यू; भाभा रुग्णालयात ३८, तर शीव रुग्णालयात ७ जणांवर उपचार
Two speeding bikes collide head-on two killed
अमरावती : भरधाव दुचाकींची समोरासमोर धडक; दोन ठार
Kurla Best bus accident, Sanjay More ,
Kurla Bus Accident : कुर्ला बेस्ट बस अपघात प्रकरणी चालक संजय मोरेला अटक
Mumbai Bus Accident
Mumbai Bus Accident : मुंबईत बेस्टच्या बसची अनेकांना धडक, ३ ठार, १७ गंभीर जखमी

ऑटोमधील युग भोरे, मंगल अंडरस्कर, काजल करलुके, पवन पांडे या चार विद्यार्थ्यांना गंभीर दुखापत झाल्यामुळे यवतमाळ येथे दाखल करण्यात आले. तर लखन खांडरे, श्रवण मोरे, तुषार हरपलवार, अनुज फुलमाळी, विक्रम पारिसे, छकुली शिवरकर हे विद्यार्थी किरकोळ जखमी झाले. त्यांना ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे उपचार करून सुट्टी देण्यात आली. राजू जळेकर असे ऑटो चालकाचे नाव असून तो नेहमीच आष्टा, मेगापूर, बोरी येथून विद्यार्थी शाळेत ने-आण करीत होता. गुरुवारीही तो १३ विद्यार्थ्यांना शाळा सुटल्यानंतर आष्टा-मेगापूर येथे सोडून देत होता.

आणखी वाचा-नागपूर : गोसीखुर्द प्रकल्पांसाठी निधीची प्रतीक्षा संपेना

दरम्यान घटना घडताच शाळेतील शिक्षक व पालकांनी ग्रामीण रुग्णालय राळेगाव येथे गर्दी केली. चार वर्षापूर्वी आष्टा येथील विद्यार्थी ऑटोने शाळेत येत असताना अपघात होऊन ठार झाला होता. त्यामुळे ही घटना घडताच पालकांमध्ये खळबळ उडाली.

Story img Loader