नागपूर : एका भरधाव जीपने १३ वर्षीय विद्यार्थ्यांला पोलीस ठाण्यासमोरच चिरडल्याची घटना सोमवारी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली.  सागर एकनाथ मोकासे रा. ताजनगर, असे मृताचे नाव आहे. तो आठव्या वर्गात शिकत होता. सागर याचे वडील एकनाथ यांचा हारफुलांचा व्यवसाय आहे. सागरला स्वेटर हवे होते. कोराडी पोलीस ठाण्यासमोर स्वेटर्सची दुकाने लागली आहेत. एकनाथ  त्याला घेऊ न तेथे गेले. रस्ता दुभाजकाजवळ सावनेरकडे जाणाऱ्या भरधाव जीपने त्याला चिरडले. जीपसह चालक पसार झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

याबाबत कळताच कोराडी पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.  त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. पण, डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी कोराडी पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल केला. सागरला मोठी बहीण आहे. सागरच्या मृत्यूने मोकासे कुटुंबीयांना जबर धक्का बसला आहे.