नागपूर : ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्प वाघांसाठीच नाही तर आता फुलपाखरांसाठीही ओळखले जाणार आहे. दहा वर्षांच्या अभ्यासावर आधारित तयार झालेल्या अहवालात या व्याघ्रप्रकल्पात सहा कुळातील फुलपाखरांच्या १३४ प्रजाती आहेत. हा शोधनिबंध आंतरराष्ट्रीय जर्नल ऑफ इन्सेक्ट बायोडायव्हर्सिटी अँड सिस्टेमॅटिक्समध्ये प्रकाशित झाला आहे.

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पात २००८-२०१० दरम्यान पहिले सर्वेक्षण सेलू येथील डॉ. आर. जी. भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. आशीष टिपले यांनी केले होते. त्यात फुलपाखरांच्या १११ प्रजातींची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर २०११-२०२१ दरम्यान टिपले यांच्यासोबत विभागीय वनाधिकारी शतानिक भागवत यांनी एकत्रित अभ्यास केला. अभ्यासात आढळलेल्या एकूण ६० प्रजाती सहज आढळणाऱ्या, ३४ प्रजाती सामान्य, नऊ वारंवार आढळणाऱ्या होत्या. १९ दुर्मिळ व १२ अत्यंत दुर्मिळ आहेत.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
white giant squirrel spotted in mahabaleshwar
Video : महाबळेश्वरमध्ये पांढऱ्या शेकरूचे दर्शन !
इयन बोथम आणि मर्व्ह ह्यूज
मैदानावरच्या हाडवैरीने वाचवला मगरींच्या तावडीतून जीव; इयन बोथम यांनी सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
only rs 100 crore balance left in vault of thane municipal corporation
ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; दिवाळीनंतर पालिकेचे निघाले दिवाळ
New Spider Species Baner Hill, Baner Hill,
कोळ्याच्या नवीन प्रजातीचा बाणेर टेकडी येथे शोध, काय आहे वेगळेपण?

‘निम्फॅलिडे’ कुळातील ४३ प्रजाती या अभ्यासात आढळल्या असून त्यापैकी चार प्रजातींची ताडोबात पहिल्यांदाच नोंद झाली आहे. ‘लिसीनिडी’ कुळातील ४१ प्रजातींपैकी १२ प्रजाती नवीन आहेत. ‘पायरिडी’ कुळातील १९ पैकी तीन प्रजाती पहिल्यांदाच नोंदवल्या गेल्या आहेत. ‘हिस्परिडी’ कुळातील २० प्रजातींपैकी सहा प्रजाती पहिल्यांदा नोंदवल्या गेल्या आहेत. ‘पॅपिलिओनिडी’ कुळातील दहा पैकी दोन प्रजाती नवीन आढळल्या आहेत. तर एक प्रजाती ‘रिओडीनिडी’ कुळातील नोंदवली गेली. हे सर्वेक्षण तलाव, नद्या आणि आसपासच्या भागांजवळ करण्यात आले. बागा, वृक्षारोपण केलेली ठिकाणे आणि कुरणे अशा माणसांचा वावर असण्याच्या ठिकाणांवर फुलपाखरे कमी आढळली. पावसाळय़ापासून हिवाळय़ाच्या सुरुवातीपर्यंत फुलपाखरे जास्त प्रमाणात आढळली. मात्र त्यानंतर उन्हाळय़ाच्या सुरुवातीला त्यात घट झाली. खाद्य वनस्पतीची अनुपलब्धता आणि पाण्याची कमतरता हे या घसरणीचे कारण असू शकते. निरोगी व उत्तम अनुवंशिक वैविध्य असणाऱ्या फुलपाखरांच्या प्रजाती टिकून राहण्यासाठी विदेशी खाद्य वनस्पतीऐवजी विविध प्रथिने आणि क्षरांचे स्त्रोत असणाऱ्या देशी वनस्पतीची लागवड करावी, हे देखील या अभ्यासात सुचवले आहे.

सहसा ओळखल्या जात नसलेल्या प्रजातींचा अभ्यास करण्याची गरज आहे. फुलपाखरे परागीकरणासाठी महत्त्वाची असतात. कारण ती मकरंद पिण्यासाठी वेगवेगळय़ा फुलांना भेट देतात. त्यामुळे फुलपाखरू हा पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक आहे. पर्यावरणातील लहान लहान घटक या कीटकांना जाणवतात आणि निवासस्थान, वातावरणातील तापमान, हवामानातील बदल याचा थेट परिणाम त्यांच्यावर होतो. – डॉ. आशीष टिपले, प्राणिशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. आर.जी.भोयर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पातील नोंदीत २७ नवीन प्रजातींची भर घालून आता फुलपाखरांच्या एकूण १३४ प्रजातीेची नोंद झाली आहे. यातील सुमारे १२ प्रजाती भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा १९७२ अंतर्गत संरक्षित आहेत. – शतानिक भागवत, विभागीय वनाधिकारी