चंद्रपूर : जगभरात वाघांच्या अवयवाची प्रचंड मागणी असल्याने देशात वाघांची शिकार करणाऱ्या टोळ्या वाढल्या आहेत. चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्यातसुद्धा बावरिया टोळीने दोन वाघांची शिकार केल्याचे समोर आले असून १९ जणांना अटक करण्यात आली आहे.

वाईल्डलाईफ प्रोटेक्शन सोसायटी ऑफ इंडियाच्या अहवालानुसार १९९४ ते २०२३ या तीन दशकांत १३७७ वाघांची शिकार झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे देशभरातील वाघांच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

majority of bird species in india face decline
देशातील पक्ष्यांच्या संख्येत लक्षणीय घट; जाणून घ्या, मानवी चुका किती हानीकारक
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Viral Video Shows Pet Dog Help Her Owner
मैं हूँ ना…! मालकिणीला मदत करण्यासाठी श्वानाची धडपड; काठी काढण्यासाठी मारली उडी अन्… पाहा VIRAL VIDEO
wild animals adoption scheme
मुंबई: राष्ट्रीय उद्यानातील वाघ, बिबट्या पालकांच्या प्रतीक्षेत
sahyadri tiger project
१०० किलोमीटरचे अंतर पार करून वाघ सह्याद्री व्याघ्रप्रकल्पात…
maharashtra pollution control board to submit report to ngt on noise pollution
सर्वच गणेश मंडळांकडून ध्वनिप्रदूषण! महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ देणार ‘एनजीटी’ला अहवाल
Stone pelted on Prof Laxman Hake vehicle in Nanded news
नांदेडमध्ये प्रा. लक्ष्मण हाकेंचे वाहन फोडले
Vikramgad Assembly, Vikramgad Assembly Shivsena Rebellion,
पालघर : विक्रमगड विधानसभेतील शिवसेना बंडखोरीमुळे पालघरमधील महायुतीत वादाची ठिणगी

चंद्रपूर-गडचिरोली जिल्ह्यातील सीमावर्ती भागात वाघांची शिकार केल्याप्रकरणी तेलंगणापासून आसाम, दिल्लीपर्यंतच्या आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये निवृत्त वनअधिकाऱ्याचाही समावेश आहे. त्यामुळे देशपातळीवर वाघांची शिकार करणाऱ्या टोळ्या आणि राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्तरावर वाघांच्या अवयवांची तस्करी करणाऱ्या टोळ्या सक्रिय असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – चंद्रपूर: वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्यू झाल्यास व्यक्तीच्या वारसांना मिळणार २५ लाख रुपयांचे अर्थसाह्य

शिकारीमध्ये महाराष्ट्राव्यतिरिक्त मध्यप्रदेश, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल, बिहार, आंध्रप्रदेश, कर्नाटक, केरळ, राजस्थान, उत्तराखंड, आसाम या राज्यांचा समावेश होतो. चंद्रपूर जिल्ह्याला वाघांचे माहेरघर म्हटले जाते. येथे वाघांची संख्या उल्लेखनीय आहे. वाघाच्या हाडांशिवाय पारंपरिक औषधांसाठी आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत वाघाची कातडी, नखे आदी अवयवांना मागणी असल्याचे सांगितले जाते. त्यामुळे वाघांची शिकार वाढत आहे.

बावरिया टोळींच्या १९ जणांना अटक

चंद्रपूर-गडचिरोली सीमेवर वाघांच्या शिकारीप्रकरणी संयुक्त कारवाई करत बावरिया टोळींच्या १९ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये तेलंगणातील करीमनगर, आसाममधील गुवाहाटी आणि दिल्ली येथील आरोपींचा समावेश आहे. पूर्वी दिल्लीतून अटक करण्यात आलेला ८१ वर्षीय निवृत्त वनाधिकारी शिकारी टोळ्यांच्या संपर्कात राहून वाघांच्या अवयवांचा व्यापार करत होता. आरोपी जाखड हा वाघांची शिकार आणि वाघांच्या शरीराच्या अवयवांच्या अवैध व्यापारावर नियंत्रण ठेवत असल्याचे सांगितले जाते.

हेही वाचा – वर्धा पोलीस उत्कृष्ट तपासात राज्यात अव्वल; सबळ पुरावा नसताना जळीत कांडातील आरोपींना केले गजाआड

वाघ तिथे सुरक्षा आवश्यक

आज वाघांची संख्या व्याघ्र प्रकल्प किंवा संरक्षित क्षेत्राबाहेरसुद्धा वाढत आहे आणि संघर्षसुद्धा वाढत आहे. एखाद्या संरक्षित क्षेत्रापेक्षा प्रादेशिक किंवा वन्यप्राणी व्यवस्थापनदृष्ट्या कमकुवत असलेले असे क्षेत्र या शिकारींना नक्कीच आकर्षित करीत आहे. तेव्हा जिथे जिथे वाघ वाढत आहे, तिथे तिथे वनविभागाने व्याघ्र प्रकल्प, अभयारण्यसारखे वन्यप्राणी संरक्षण दर्जा सुधारला पाहिजे. प्रत्येक वाघ सुरक्षित राहिला पाहिजे. – बंडू धोतरे, अध्यक्ष इको प्रो-संस्था

वाघांच्या शिकारीची आकडेवारी

वर्ष – संख्या
११९५ – १२१
११९६ – ५२
११९७ -८८
११९८ – ३९
११९९ – ८१
२००० – ५२
२००१ – ७२
२००२ – ४६
२००३ – ३८
२००४ – ३८
२००५ – ४६
२००६ – ३७
२००७ -२७
२००८ – २९
२००९ – ३२
२०१० – ३०
२०११ – १३
२०१२ – ३२
२०१३ – ४३
२०१४ – २३
२०१५ – २६
२०१६ – ५०
२०१७ – ३८
२०१८ – ३४
२०१९ – ३८
२०२० – ३१
२०२१ – ५६
२०२२ – ३९