नागपूर रेल्वेस्थानकावर बेवारस आढळलेल्या एक हजार ३९९ बालकांना मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने (आरपीएफ) त्यांना त्यांच्या पालकांकडे सुरक्षित पोहोचवले.

हेही वाचा- गोंदिया पालिकेकडून कर न भरणाऱ्या तीन मालमत्ता सील; दोन शिकवणी वर्गांना नोटीस

Thane district candidates withdraw, candidates election Thane, Thane,
ठाणे जिल्ह्यात ९० उमेदवारांची निवडणुकीतून माघार, जिल्ह्यात २४४ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
Who is Madhurima Raje?
Madhurima Raje : सतेज पाटील ज्यांच्यामुळे ढसाढसा रडले…
nagpur total 717 candidates in arena with fadnavis and bawankule
फडणवीस, बावनकुळे, केदार, देशमुखांसह २१७ रिंगणात
Raigad seven constituencies , Raigad ,
रायगडमधील सात मतदारसंघांत ७३ उमेदवार निवडणूक रिंगणात
nagpur in seven constituencies After 77 candidates withdrew 102 candidates remain
यवतमाळ जिल्ह्यात बाजोरीया, नाईक, उकंडेंसह ७७ जणांची माघार…आता मैदानात…
cidco mahagruhnirman yojana received good response with 68000 application submitted
सिडकोच्या २६ हजार घरांच्या अर्जनोंदणीसाठी अखेरचे ७ दिवस 
Over 150 prisoners in the state will be released from jail
राज्यातील दीडशेवर कैद्यांची होणार कारागृहातून सुटका; नागपूर आणि पुण्यातील…
Mhada mumbai
म्हाडा मुंबई मंडळ सोडत २०२४ : सुमारे ४४२ घरांसाठी प्रतीक्षा यादीवरील विजेत्यांना संधी

रेल्वेस्थानक, रेल्वेगाड्या किंवा रेल्वेस्थानक परिसरात बेवारस स्थितीत आढळणारी बालके असामाजिक तत्त्वांच्या हाती लागून त्यांचे काही वाईट होऊ नये म्हणून ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत मुलांना वाचवण्याची जबाबदारीही ‘आरपीएफ’वर आहे. मध्य रेल्वेच्या सुरक्षा दलाने लोहमार्ग पोलीस आणि इतर फ्रंटलाईन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत जानेवारी-२०२२ ते डिसेंबर-२०२२ या कालावधीत मध्य रेल्वेवरील रेल्वेस्थानकाच्या फलटावर आढळलेल्या बेवारस एक हजार ३९९ मुलांना सुखरूप त्यांच्या घरी पोहोचले. यामध्ये ९४९ मुले आणि ४५० मुलींचा समावेश आहे. ‘आरपीएफ’ने चाईल्डलाईन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांच्या सुपूर्द केले.

हेही वाचा- धक्कादायक..! देशभरातील ४७ बँकांची ३९ हजार कोटींनी फसवणूक

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’साठी ‘आरपीएफ’ जवानांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले. ते घरगुती भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा शहराचे ग्लॅमर जीवन इत्यादींच्या आकर्षणामुळे आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वेस्थानकावर येणाऱ्या मुलांचा शोध घेतात. हे प्रशिक्षित ‘आरपीएफ’ जवान मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात व त्यांची पालकांसोबत भेट घडवून आणतात.

हेही वाचा- नागपूर : महामेट्रोचा आता लवकरच मनोरंजन पार्क; मुलांसाठी आगळी-वेगळी खेळणी असणार

नागपूर विभागात १५७ मुले सुखरूप घरी

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने सर्वाधिक ६१५ मुलांची सुटका केली, ज्यात ४४१ मुले आणि १७४ मुलींचा समावेश आहे. भुसावळ विभागाने २८४ मुलांची सुटका केली ज्यामध्ये १५० मुले आणि १३४ मुलींचा समावेश आहे. पुणे विभागाने २८५ मुलांची सुटका केली असून त्यात २३३ मुले आणि ५२ मुलींचा समावेश आहे. नागपूर विभागाने १५७ मुलांची सुटका केली असून यामध्ये ८९ मुले आणि ६८ मुलींचा समावेश आहे. सोलापूर विभागातून बचावलेल्या ५८ मुलांमध्ये ३६ मुले आणि २२ मुलींचा समावेश आहे.