गडचिरोली : छत्तीसगड-ओडिशा सीमेवर मंगळवारी सकाळी झालेल्या चकमकीत १४ नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात छत्तीसगड पोलिसांना यश आले. मृत नक्षलवाद्यांमध्ये ओडिशा राज्याचा प्रभारी, केंद्रीय समिती सदस्य जयराम उर्फ चलपती याचा समावेश असून त्याच्यावर विविध राज्यांमध्ये दोन कोटींपेक्षा अधिकचे बक्षीस होते. मिलिंद तेलतुंबडेनंतर चकमकीत ठार झालेला जयराम हा दुसरा केंद्रीय समिती सदस्य आहे. अजूनही चकमक सुरू असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असे पोलिसांनी सांगितले.

छत्तीसगड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळच्या सुमारास छत्तीसगड-ओडिशा सीमेवरील गरियाबंद जिल्ह्यातील मैनपूर कुल्हाडीघाट जंगल परिसरात मोठ्या संख्येने नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती सुरक्षा यंत्रणेला मिळाली होती. यावरून त्याभागात एक हजाराहून अधिक सुरक्षा जवानांनी संयुक्तपणे नक्षलविरोधी अभियान राबाविले. दरम्यान, जंगलात दडून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने जोरदार गोळीबार केला. सुरक्षा जवानांनीदेखील तेवढ्याच प्रखरतेने प्रत्युत्तर दिले. पोलिसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवादी जंगलाचा दिशेने पळून गेले.

Symptoms and Treatment of Guillain-Barré Syndrome in Pune
Guillain Barre Syndrome: पुण्यात दुर्मिळ गुइलेन बॅरे सिंड्रोमचे २२ संशयित रुग्ण; ‘या’ भागातले सर्वाधिक संशयित!
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
broken engagement in rajasthan
सद्दाम झाला शिवशंकर; तरुणीनं बलात्काराचा गुन्हा दाखल करताच मुस्लीम तरुणानं लग्नासाठी बदलला धर्म
Shrirang Barge statement regarding vacant land of ST Corporation Nagpur news
एसटीच्या मोकळ्या जागा विकासकाच्या घशात… संघटना म्हणते धर्मादाय संस्था…
Mushtaq Ahmed digging grave of Yasmeen Akhtar, last daughter of Mohammad Aslam dying of mystery illness
एक लग्न अन् १७ अंत्यसंस्कार, जम्मूतील गावात रहस्यमय आजार; ३ कुटुंबे उद्ध्वस्त, मृत्यूच्या कारणांंमुळे तज्ज्ञही हैराण
Rinku Singh marriage announcement with mp priya saroj
क्रिकेटपटू रिंकू सिंहचं खासदार प्रिया सरोजशी लग्न ठरलं; दोघांच्या कुटुंबियांनी दिली मान्यता
Saif Ali Khan attacker hid in garden of actors building
सैफवर हल्ला केल्यावर दोन तास त्याच इमारतीत होता आरोपी, पोलिसांनी दिली माहिती; म्हणाले, “त्याने त्याच्या भावाला…”
Nita Ambani dazzled at Donald Trump’s pre-inauguration reception in Washington DC, showcasing Indian artistry through a Kanchipuram sari by National Award-winning artisan B. Krishnamoorthy and heritage jewelry.
Nita Ambani : डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी समारंभात नीता अंबानींनी परिधान केला १८ व्या शतकातील रत्नहार, साडी लूकचीही चर्चा

हेही वाचा >>>एसटीच्या मोकळ्या जागा विकासकाच्या घशात… संघटना म्हणते धर्मादाय संस्था…

चकमकीनंतर जवानांनी घटनास्थळाची तपासणी केली असता १४ नक्षलवाद्यांचे मृतदेह आढळून आले. यामध्ये ओडिशा राज्याचा प्रभारी तसेच नक्षलवाद्यांच्या केंद्रीय समितीचा सदस्य जयराम उर्फ चलपती देखील ठार झाला. मृतांमध्ये आणखी काही मोठे नक्षल नेते मारल्या गेल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दुपारपर्यंत पोलिसांची शोधमोहीम सुरूच असल्याने मृतांचा आकडा वाढू शकतो, असे छत्तीसगडच्या पोलीस प्रशासनाने सांगितले.

बिजापूर येथील हल्ल्यात १२ जवान शहीद झाल्यानंतर सुरक्षा यंत्रणेने नक्षलविरोधी मोहीम अधिक तीव्र केली असून नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात आत्तापर्यंत ४४ नक्षलवाद्यांना ठार करण्यात यंत्रणेला यश आले आहे.

हेही वाचा >>>“सुधीर मुनगंटीवार मंत्री होत नाही तोवर पादत्राणे…” चंद्रपुरातील ‘या’ व्यक्तीने घेतला संकल्प

मिलिंद तेलतुंबडेनंतर जयराम…

नक्षलवाद्यांच्या यंत्रणेत केंद्रीय समितीला सर्वोच्च स्थान आहे. या समितीच्या सदस्यांवर मोठी जबाबदारी असते. त्यामुळे चकमकीत केंद्रीय समिती सदस्य ठार झाल्याची खूप कमी प्रकरणे आहेत. पाच वर्षांपूर्वी महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगडचा प्रभारी केंद्रीय समिती सदस्य तसेच नक्षल चळवळीचा जहाल नेता मिलिंद तेलतुंबडे चकमकीत ठार झाला होता. गडचिरोली पोलिसांनी ही मोहीम फत्ते केली होती. त्यानंतर चकमकीत ठार झालेला जयराम उर्फ चलपती हा दुसरा केंद्रीय समिती सदस्य आहे. त्याच्यावर ओडिशा राज्याची जबाबदारी होती. विविध राज्यांत त्याच्यावर  २  कोटींहून अधिकची बक्षिसे होती.

Story img Loader