बुलढाणा : मध्यप्रदेश राज्याच्या सीमेला लागून असलेल्या जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात ठाणे पोलिसांनी धाडसी कारवाई केली. या कारवाईत तब्बल १४ देशी पिस्टल, २५ मेगझिन, ८० जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे.
काही दिवसांपूर्वी ठाणे हद्दीत केलेल्या कारवाईनंतर ठाणे पोलिसांनी चिकाटीने पाठपुरावा करून ही कारवाई केली आहे. यापूर्वी मागील १ जून रोजी ठाण्याच्या राबोडी पोलिसांनी एकाला ठाण्यात जेरबंद केले होते. त्याच्याकडील गावठी पिस्टल जप्त करून चौकशीनंतर ठाणे पोलिसांनी संग्रामपूर (जिल्हा बुलढाणा) तालुक्यातील सोनाळा पोलीस हद्दीत कारवाई केली. त्यात वरीलप्रमाणे अग्निशस्त्रे व पूरक साहित्य जप्त करण्यात आले.
हेही वाचा – अमरावतीत रंगणार मद्यपींचे संमेलन!
या प्रकरणी ठाणे पोलिसांनी मध्यप्रदेशमधील दोघांना जेरबंद केले आहे. रमेश मिसरिया किराडे (बिलाला) २५ वर्षे, मुन्ना अलवे (बारेला) ३४, दोन्ही राहणार पाचोरी, तालुका दात पहाडी, जिल्हा बऱ्हाणपूर, मध्यप्रदेश अशी आरोपींची नावे आहे.
अवैध शस्त्र निर्मिती व तस्करीचे केंद्र
दरम्यान मध्यप्रदेशमधील दुर्गम घनदाट जंगलाने व्याप्त पचोरी व अन्य भाग अवैध शस्त्र निर्मिती व तस्करीचे केंद्र आहे. याला लागून असलेल्या बुलढाणा जिल्ह्यातील टूनकी व अन्य भागांतून होणाऱ्या तस्करी व अवैध गुप्त वाहतुकीचे जाळे राज्यात पसरले आहे. राज्यात या पद्धतीने अवैध शस्त्र तस्करी होते हे या कारवाईने पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. गेल्या वर्षी याच ठिकाणी झारखंड एटीएसने अशीच कारवाई केली होती.