नागपूर : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे १४ अनारक्षित विशेष गाड्या चालवणार आहे.
हेही वाचा – टीईटी परीक्षेचा निकाल जाहीर, ६४ हजार उमेदवार पात्र; २० हजार जागांवर होणार शिक्षक भरती
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस ६ डिसेंबर २०२३ रोजी आहे. यासाठी ३ विशेष गाड्या नागपूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई, ६ विशेष रेल्वेगाड्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई/दादर ते सेवाग्राम/अजनी/नागपूर, २ विशेष रेल्वेगाड्या कलबुरगी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईदरम्यान, २ विशेष रेल्वेगाड्या सोलापूर ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईदरम्यान आणि १ विशेष रेल्वेगाड्या अजनी ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई चालविण्यात येणार आहेत. या सर्व विशेष रेल्वेगाड्या चार ते आठ डिसेंबर दरम्यान सोडण्यात येणार आहेत.