अमरावती : मध्‍य रेल्‍वेच्‍या भुसावळ विभागात मुर्तिजापूर येथे अभियांत्रिकी कामांसाठी ३० ते ३१ ऑगस्‍ट दोन दिवस मेगाब्‍लॉक घेण्‍यात आला आहे. त्‍यामुळे १४ एक्‍स्‍प्रेस आणि पॅसेंजर रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्‍या आहेत.

अनेक मार्गांवर दोन मालगाड्या एकत्र जोडून धावत आहेत. यामुळे रेल्‍वेचा वेळ वाचतो आणि मार्गावरील कोंडी दूर होण्‍यास मदत होते. भुसावळ विभागात मुर्तिजापूर येथे या लूप बांधकामासाठी ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी ६ वाजेपासून ते ३१ ऑगस्‍ट रोजी दुपारी २ वाजेपर्यंत हा मेगाब्‍लॉक घेण्‍यात येणार आहे.

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Eknath Shinde on Ladki Bahin Yojana Sixth installment
महायुतीला सत्ता मिळाली, लाडक्या बहिणींना २१०० रुपये कधीपासून…
fake graduation certificate pune municipal corporation
पुणे महापालिकेच्या उपायुक्तासह शिक्षणाधिकारी, लिपिकाविरुद्ध गुन्हा दाखल; बनावट पदवी सेवा पुस्तिकेत जोडून महापालिकेची फसवणूक
Jaipur railway track incident thar stuck in drunken misadventure shocking video goes viral
VIDEO: रील बनवण्यासाठी दारुड्यानं थेट रेल्वे ट्रॅकवर नेली थार; तितक्यात पाठीमागून मालगाडी आली अन्…थरारक शेवट
Pune Blockade, Reckless driving, crime pune,
शहरबात : नाकाबंदीचे फलित
flying squads, Thane district code of conduct , assembly election
ठाणे : आचार संहितेच्या काळात २३ कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त; लाखो लिटर दारू; ६ कोटींचे मोफत वाटप साहित्य; १ कोटींचे अंमली पदार्थ
midc conversion land in thane belapur belt for residential complexes
नवी मुंबईच्या औद्योगिक पट्ट्यातीलही भूखंड खासगी विकासकाकडे!

हेही वाचा – अकोला : केवळ ५० टक्केच पशुधनाचे लसीकरण, ‘लम्पी’चा धोका पुन्हा वाढला

हेही वाचा – चंद्रपूर : काँग्रेस जिल्हाध्यक्ष धोटे यांची स्वबळाची भाषा…

या कामांमुळे १७६४१ काचिगुडा-नरखेड एक्‍स्‍प्रेस ( ३० ऑगस्‍ट) १७६४२ नरखेड-काचिगुडा एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट) ०११२७ लोकमान्य टिळक टर्मिनस- बल्‍लारशाह विशेष एक्‍स्‍प्रेस (२९ ऑगस्ट), ०११२८ बल्‍लारशाह- लोकमान्‍य टिळक टर्मिनस विशेष एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १११२१ भुसावळ-वर्धा एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्ट), १११२२ वर्धा-भुसावळ एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), २२११७ पुणे-अमरावती एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), २२११८ अमरावती-पुणे एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट), ०१३६५ भुसावळ-बडनेरा पॅसेंजर (३१ ऑगस्‍ट), ०१३६६ बडनेरा-भुसावळ पॅसेंजर (३१ ऑगस्‍ट), १२१११ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – अमरावती एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट) १२११२ अमरावती- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट), १२१३६ नागपूर-पुणे एक्‍स्‍प्रेस (३० ऑगस्‍ट) १२१३५ पुणे-नागपूर एक्‍स्‍प्रेस (३१ ऑगस्‍ट) या रेल्‍वेगाड्या रद्द करण्‍यात आल्याची माहिती मध्‍य रेल्‍वेने दिली आहे.