प्रशांत रॉय, लोकसत्ता

नागपूर : ‘‘गोमूत्रात ‘ई-कोलाय’सह १४ प्रकारचे हानीकारक जिवाणू असतात. त्यामुळे थेट गोमूत्र प्राशन करणे मानवी आरोग्यास अपायकारक ठरू शकते’’, असा दावा बरेलीच्या पशुविज्ञान संस्थेतील संशोधकांनी केला आहे. हे संशोधन संस्थेला सादर करण्यात आले असून, संकेतस्थळावरही प्रकाशित करण्यात आले आहे. या निष्कर्षांमुळे गोमूत्रावरून पुन्हा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.

Who will be the Chief Minister Vidhan sabha election 2024
“कोण होणार मुख्यमंत्री?” शिंदे की फणडवीस? कोणाचा पक्ष मारणार बाजी? ज्योतिषतज्ज्ञांनी सांगितली भविष्यवाणी
eknath shinde
Eknath Shinde: एकनाथ शिंदे विरोधी पक्ष नेते? ‘दाल…
What is NOTA in Elections and What Happens When NOTA gets Most Votes
NOTA in Elections : NOTA खरंच महत्त्वाचे आहे का? सर्वाधिक मते नोटाला मिळाले तर काय होईल?

भारतीय पशुसंशोधन संस्था (आयव्हीआरआय) ही देशातील पशूंबाबत संशोधन करणारी नामांकित संस्था आहे. येथील भोजराज सिंग यांच्यासह तीन ‘पीएचडी’च्या विद्यार्थ्यांनी हे संशोधन केले असून, त्यासंदर्भातील वृत्त माध्यमांत प्रसिद्ध झाले आहे.  ‘‘भारतात गोमूत्र पवित्र मानले गेले असले तरी थेट मानवी सेवनास ते योग्य किंवा सुरक्षित नाही. गाय, म्हैस, बैलांच्या मूत्रात बरेच हानिकारक जिवाणू असतात. हे जिवाणू मानवाच्या पोटात जाऊन विविध रोग, आजारांचे संक्रमण वाढवू शकतात’’, असे या संशोधन अहवालात नमूद करण्यात आले आहे.

दुसरीकडे, प्रक्रियायुक्त गोमूत्र जिवाणूरहित असल्याने त्याचा अपाय संभवत नाही, असे काही जाणकारांचे मत आहे. मात्र, यासंदर्भात आणखी संशोधन सुरू असून, त्याचे निष्कर्ष लवकरच प्रकाशित करण्यात येणार आहेत.

हिंदू धर्मात गोमूत्र पवित्र मानले जाते. ते घरातील अंगणात शिंपडल्यास वातावरणातील घातक घटक नष्ट होतात, असे मानले जाते. तसेच घरी काही मंगल कार्य असल्यास गोमूत्र शिंपडण्याची प्रथा आहे.

प्रतिजैविक म्हणून म्हशीचे मूत्र जास्त प्रभावी

गायी, म्हैस आणि बैलांच्या मूत्र नमुन्यांची तपासणी केली असता गायींपेक्षा म्हैसवर्गीय जनावरांच्या मूत्रात जिवाणूविरुद्ध लढण्याची क्षमता, गुणधर्म जास्त आहेत. त्यामुळे प्रतिजैविक म्हणून म्हशीचे मूत्र जास्त प्रभावी असल्याचेही या संशोधनात नमूद करण्यात आले आहे.

उपकारक आणि अपायकारक अशा दोन्ही प्रकारचे जिवाणू सर्वत्र आढळतात. जनावरांचे जनुकीय गुणधर्म, त्यांना दिला जाणारा पौष्टिक हिरवा चारा आणि स्वच्छता या बाबी महत्त्वपूर्ण आहेत. यावर आणखी अभ्यास, संशोधन होणे गरजेचे आहे.

– डॉ. शरद निंबाळकर, माजी कुलगुरू, कृषी विद्यापीठ, अकोला.

हे संशोधन प्रक्रियायुक्त गोमूत्रावर (डिस्टिल काऊ युरीन) करण्यात आलेले नाही. त्यामुळे त्याचे सामान्यीकरण करता येणार नाही.

– डॉ. गौतम भोजणे, सहा. प्राध्यापक, पशुवैद्यकीय महाविद्यालय, नागपूर.

Story img Loader