भरधाव बस चालवत असताना अचानक चालकाला डुलकी लागली. त्यामुळे बस अनियंत्रित होऊन उलटली.या अपघातात १५ प्रवाशी जखमी झाले. नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मरारवाडीजवळ हद्दीत गुरुवारी सकाळी पाच वाजता हा अपघात झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जबलमधील ३५ भाविक देवदर्शनासाठी खासगी बसने (पीवाय०१ सीयू ५७९१) जात होते.
हेही वाचा >>> बुलढाणा: सैलानीबाबांच्या दर्शनासाठी येणारे वाहन उलटले; २० भाविक जखमी
गुरुवारी सकाळी पाच वाजता बस नागपूर जबलपूर राष्ट्रीय महामार्गावर मरारवाडीजवळून जात होती. बसचालकाला पहाटेच्या सुमारास डुलकी लागली. त्यामुळे बसवरील नियंत्रण सुटले. अचानक बस रस्त्याच्या खाली उतरली आणि रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी कठड्याला लागून उलटली. या अपघातात १५ प्रवासी जखमी झाले. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणाची ग्रामीण पोलीस नियंत्रण कक्ष आणि स्थानिक पोलीस ठाण्याला कोणतीही माहिती नव्हती. तसेच पोलीस निरीक्षकांनाही कोणतेही गांभीर्य नव्हते. त्यामुळे अपघाताबाबत सविस्तर माहिती मिळू शकली नाही.