लोकसत्ता टीम
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
नागपूर : केंद्र सरकारच्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालयाद्वारे पीएम ई-बस योजनेअंतर्गत नागपूर महापालिकेने पाठवलेल्या १५० ई-बसेसच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या बसेस भविष्यात शहर बससेवेच्या ताफ्यात सहभागी होणार असल्याने येथील सार्वजनिक प्रवासी वाहतुकीला बळ मिळणार आहे.
उपराजधानीत सध्या अनेक रस्त्यांवर खडखड आवाज करत धावणाऱ्या अनेक शहरी बसेसचा नागरिकांना त्रास होतो. प्रवासी वाहतुकीचे इतर पर्याय आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याने शहरी बसेसमध्ये प्रवास करण्याशिवाय गत्यंतर नसते. त्यामुळे या नवीन बसेसमुळे नागरिकांना भविष्यात चांगल्या प्रदूषणमुक्त बसेसमध्ये प्रवास करण्याचा आनंद घेता येणार आहे.
आणखी वाचा-एसटीची चाके थांबणार! नागपुरात एसटीचे कर्मचारी बेमुदत उपोषणावर
देशातील सार्वजनिक वाहतूक यंत्रणा व शहरी वाहतूक व्यवस्थेला चालना देण्याकरिता केंद्र सरकारने पर्यावरणपूरक ‘पीएम ई-बसेस योजना’ सुरू केली आहे. योजनेंतर्गत देशभरात १० हजार ई-बसेस दिल्या जाणार आहेत. यासाठी केंद्र शासनाद्वारे विविध राज्यांकडून प्रस्ताव मागवले गेले होते. नागपूर महापालिका आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांच्या सूचनेवरून या प्रकल्पासाठी प्रस्ताव पाठवला गेला. त्यावर केंद्राने ई-बस आणि बिहाईंड-द-मीटर पॉवर या पायाभूत सुविधांच्या विकास प्रस्तावांना मान्यता दिली.
कोराडी व खापरी बस डेपोचाही विकास
केंद्राच्या सदर योजनेत लोकसंख्येच्या (२० ते ४० लक्ष) आधारावर नागपूर शहराकरिता १५० ई-बसेस, ९ मीटर तसेच बसेसच्या पार्किंगकरिता नागपूर महापालिकेच्या परिवहन विभागाने प्रस्ताव दिला होता. त्यात येथील कोराडी व खापरी बस डेपोतील चार्जिंग स्टेशनसह इतर विकास कामांचा समावेश होता. त्याला मंजुरी मिळाली आहे. त्यानुसार ७५ ई-बसेस प्रत्येकी पार्किंग डेपोसाठी कोराडी डेपोमध्ये (३३ केव्ही) करिता २१.१४ कोटी रुपये आणि खापरी डेपो (११ केव्ही) करिता ६.३७ कोटी रुपये खर्चासही मंजुरी मिळाली आहे.
आणखी वाचा-नागपुरातील ‘ओयो’त ‘सेक्स रॅकेट’, अल्पवयीन मुली…
परिवहन सेवेत सध्या ५४१ बसेसचा ताफा
नागपूर शहरातील प्रवाशांकरिता नागपूर महापालिकेच्या परिवहन सेवेत सध्या ५४१ बसेसचा ताफा आहे. ज्यामध्ये डिझेलवरील १६५ स्टँडर्ड, १५० मिडी व ४५ मिनी अशा एकूण ३६० बसेस तसेच ७० रेट्रोफिटिंग सीएनजी बसेस आणि १११ ई-बसेसचा समावेश आहे. सर्व बसेस आयटीएमएस प्रणालीने सुसज्जित असल्याचा महापालिकेचा दावा आहे.