लोकसत्ता टीम
वर्धा : राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण झाले. त्यात महाराष्ट्रातील ३५ पैकी १६ जिल्ह्यात या ऍनिमीयाचा प्रसार ५५ टक्क्यापेक्षा अधिक आहे. ही अत्यंत गंभीर बाब समजून शासन पातळीवर विविध योजना राबविल्या जात आहे.
काय आहे ही व्याधी?
ऍनिमिया म्हणजे विविध रोगाना निमंत्रण देण्याचे मूळ. प्रजननशील महिलांमध्ये याचे प्रमाण प्रामुख्याने आढळून येते. शरीरात हिमोग्लोबिन कमी झाल्यास टीस्यू व मासपेशी यांना ऑक्सिजनचा पुरवठा अपुरा पडतो. शरीर शक्तिहीन होते. त्यास ऍनिमिया म्हणतात. थकवा जानविणे, चक्कर येणे, त्वचा व डोळे पिवळे पडणे, श्वास घेण्यास त्रास अशी व अन्य लक्षणे आहेत. हिमोग्लोबिन निर्मितीसाठी लोह घटक आवश्यक आहे.
आणखी वाचा-१०० वर्षे जुन्या विद्यापीठात १९ विभागांमध्ये एकही प्राध्यापक नाही, शिक्षक दिनाचे वास्तव
लोह पुरवठा कसा करणार?
ग्रामीण भागातील महिलांमध्ये ही व्याधी प्रामुख्याने दिसून येते. तीन पैकी एक महिला ऍनिमियाने ग्रस्त आहे. त्यावर उपाय म्हणून गांधीवादी संस्था मगनसंग्रहालय ही संस्था त्यांच्या गिरड येथील केंद्रावर महिला पोषण हा उपक्रम राबविते. विशेष प्रशिक्षण घेतल्या जाते. कुटुंबासोबतच महिलांनी स्वतःचे आरोग्य जपले पाहिजे, असे सूत्र असते. समन्वयक मनिषा पेटकर म्हणतात की महिलांनी सात्विक आहार घेणे गरजेचे आहे. त्यासाठी पोषण वाटीका घरीच तयार करावी. त्यातून जैविक पोषण शक्य होणार. शेतीत रसायणाचा मोठा वापर होतं असल्याने आजार उद्भवतात. म्हणून महिलांनी घरीच विषमुक्त भाजी, फळे उत्पादन करावे, असे आवाहन पेंटे यांनी केली. यासाठी २२ गावांची निवड करण्यात आली असून ६६ महिला प्रशिक्षक तयार करण्यात आल्या आहेत. त्या त्यांच्या गावातील महिलांना पोषण वाटीका तयार करण्यास मदत करणार असून प्रत्येक कुटुंब ऍनिमिया मुक्त करण्याचा संकल्प आहे. निर्मला दडमल व विष्णू ब्राम्हणवाडे सहकार्य करतात.
आणखी वाचा-दीक्षाभूमीला कोणत्या नियमाच्या अंतर्गत जमीन देता येईल? उच्च न्यायालयाची विचारणा…
अन्य घरगुती उपाय…
शरीरातील लोहाची गरज पूर्ण करण्यासाठी गाजर, टोमॅटो पालेभाज्या आवश्यक ठरतात. वाटीकेत या भाज्या लावण्यावर भर दिल्या जात आहे. स्वयंपाक नेहमी लोखंडाच्या भांड्यात करावा. त्याने लोह प्रमाण लक्षनीय वाढते. लोहाचे प्रमाण हे शरीराच्या वजनाच्या प्रमाणात असावे लागते. ते कमी झाल्यास रक्त निर्मिती मंदावते. म्हणून महिलांनी घरगुती भाजपाला उत्पादन करण्यावर भर द्यावा असे प्रयत या २२ गावातून होणार आहे. ऍनिमियामुक्त गाव करण्याचा उपक्रम यशस्वी ठरेल, असा विश्वास महिला प्रशिक्षक व्यक्त करतात