वर्धा येथे ‘नॉन-इंटरलॉकिंग’ आणि ‘सिग्नल’ बदलण्याचे काम करण्यासाठी तब्बल सहा दिवस १६ रेल्वेगाड्या रद्द करण्यात आल्या आहेत तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात येत आहे.
वर्धा-चिटोडा दरम्यान रेल्वेमार्ग (कॉर्ड लाईन) टाकण्यात येत आहे. त्यामुळे ‘ सिग्नल ‘बदलण्यात येणार आहे. त्यासाठी नागपूरमार्गे धावणाऱ्या १६ गाड्या रद्द तर काही गाड्यांचे मार्ग बदलण्यात आले आहेत. वर्धा-बल्लारशहा-वर्धा आणि अमरावती- वर्धा-अमरावती (१४ ते १७ ऑगस्ट), नागपूर ते वर्धा मेमू (१५ ते १७ ऑगस्ट), कोल्हापूर-नागपूर एक्स्प्रेस (१५ ऑगस्ट), नागपूर-कोल्हापूर एक्स्प्रेस (१६ ऑगस्ट), शालिमार-एलटीटी-शालिमार एक्स्प्रेस (१५ व १६ ऑगस्ट), एलटीटी-बल्लारशहा एक्स्प्रेस (१६ ऑगस्ट), बल्लारशहा-एलटीटी एक्स्प्रेस (१७ऑगस्ट), अजनी-अमरावती एक्स्प्रेस (१५,१६,१७ ऑगस्ट) आणि अमरावती-अजनी एक्स्प्रेस (१६,१७ आणि १८ ऑगस्टला) रद्द करण्यात आली आहे.