नागपूर : नुकताच दहावी पास झालेला मुलगा ताजबागमध्ये दर्शनासाठी गेला. तेथे तीन मुलांसोबत आलेल्या ३८ वर्षीय महिलेशी त्याची ओळख झाली.मोबाईल क्रमांक घेऊन दोघेही संपर्कात आले आणि एकमेकांच्या प्रेमात पडले. दोघेही आपापले वय विसरुन मध्यप्रदेशात पलायन करुन संसार थाटला. मात्र, गुन्हे शाखेने (एएचटीयू) दोघांनाही ताब्यात घेतले. अल्पवयीन मुलाला पालकांच्या ताब्यात दिले तर महिलेला तिच्या पतीच्या ताब्यात देण्यात आले असून तिच्यावर कारवाई करण्यात येणार आहे. एखाद्या चित्रपटाला पटकथा शोभणार अशी घटना वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नंदनवन परिसरात ३८ वर्षीय प्रिया (बदललेले नाव) ही पती व तीन मुलांसह राहते. ती गृहिणी असून तिचा पती दारुड्या आहे. ती नेहमी मुलांना घेऊन ताजबागला दर्शनाला जाते. विलास (बदललेले नाव) हा वाठोडा परिसरात आईवडिल व बहिणीसह राहते. तो नुकताच दहावी उत्तीर्ण झाला आहे.

तो ताजबागमध्ये दर्शनासाठी गेला असता त्याची भेट प्रियाशी झाली. दोघांंनी एकमेकांचे भ्रमणध्वनी क्रमांक घेतले आणि निघून गेले. दोघांचा संपर्क वाढला आणि त्यांच्यात मैत्री झाली. पुन्हा ताजबागमध्ये भेट झाल्यानंतर प्रियाने विलासला घरापर्यंत दुचाकीने सोडून मागितले. घरी गेल्यानंतर प्रियाने दारुड्या पतीबाबत सांगितले. ‘मला तू खूप आवडतो आणि तुझ्यावर प्रेम करते’ असे बोलून विलासला प्रेमाच्या जाळ्यात ओढले.

 प्रियाने विशालला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. पती कामावर निघून गेल्यानंतर तो घरी यायला लागला. दोघांचे प्रेमसंबंध वाढले आणि प्रियाने त्याला पळून जाऊन लग्न करण्यास प्रोत्साहन दिले. प्रियाच्या प्रेमात वेडा झालेल्या विलासने होकार दिला. प्रियाने तीन मुले आणि पतीला सोडून डिसेंबर २०२४ मध्ये विलाससोबत पलायने केले. ते थेट मध्यप्रदेशातील बालाघाटला गेले.

दोघांनी थाटला संसार

प्रियाने अंगावरील सोन्याचे दागिने विकून भाड्याने खोली केली. घरात अन्न-धान्य भरले. विद्यार्थी जीवन जगत असलेला विलास कॅटरिंगचे काम करु लागला तर प्रिया एका खासगी कार्यालयात काम करु लागली. दोघांचाही संसार सुरु होता. पलायन केल्यानंतर दोन महिन्यांपर्यंत पोलिसांना त्यांचा शोध लागला नाही.

दुसरीकडे विलासच्या आई-वडिलांनी मुलाचे अपहरण केल्याची तक्रार केली. वाठोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला. गुन्हे शाखेच्या पोलीस निरीक्षक ललिता तोडासे यांच्या पथकाने तांत्रिक तपास करुन बालाघाटचा पत्ता मिळवला. तेथे छापा घालून दोघांना ताब्यात घेतले. अल्पवयीन विलासला पालकांच्या ताब्यात दिले तर प्रियाला पतीच्या ताब्यात दिले. तिच्यावर गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.