बुलढाणा: नागपूर कडे भरधाव वेगाने जाणारी खाजगी प्रवासी बस उलटल्याने झालेल्या अपघातात १७ प्रवासी जखमी झाले असून त्यांच्यावर सिंदखेडराजा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे.जखमीमध्ये यवतमाळ, वाशीम व बुलढाणा जिल्ह्यातील राहिवासीयांचा समावेश आहे.प्राप्त माहितीनुसार ,जुन्या मुंबई नागपूर मार्गावर सावखेड फाटा (तालुका सिंदखेडराजा , जिल्हा बुलढाणा) परिसरात आज शुक्रवारी ( दिनांक ७) ही दुर्घटना घडली. गावकऱ्यांच्या सहकार्यामुळे मोठी दुर्घटना टळल्याचे समजते. पुणे ते मानोरा (जिल्हा वाशीम) कडे जाणाऱ्या ( ए आर ०६ ए ९७४१ क्रमाकाच्या ) चिंतामणी ट्रॅव्हल्स बसला आज हा अपघात झाला.
हेही वाचा >>> रेल्वेत खाद्य पदार्थ खाताना सावधान! विषबाधेचे प्रमाण वाढले
चालकाचे नियंत्रण सुटून बस रस्त्याच्या कडेला उलटली. अपघातातील जखमींचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. योगेश गणेश शेंदुरकर २५ वर्ष, रा. कोठारी तालुका मंगरूळपीर जिल्हा वाशिम, दिनेश मधुकर राठोड वय २४ वर्ष रा. पिंपळखुटा तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ, संदीप बाबू सिंग राठोड वय ३१ वर्षे रा. पिंपळगाव, तालुका दारवा जिल्हा यवतमाळ, प्रीतम संतोष पडघान २४ वर्ष राहणार आडोळी, तालुका जिल्हा वाशिम,अंकुश प्रल्हाद पोहाणे राहणार कवठळ, तालुका मंगरूळपीर ,जिल्हा वाशिम, सुनील मोहन पवार राहणार वार्डा खेरडा, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम,वैष्णवी पुरुषोत्तम अंभोरे १९ वर्ष, राहणार सावरखेड तालुका बार्शीटाकळी जिल्हा अकोला,उज्वल पुरुषोत्तम अंभोरे सोळा वर्ष राहणार सावरखेड, तालुका बार्शीटाकळी, जिल्हा अकोला, सौरव विजय पोले वय २१ वर्ष राहणार शिवनी, तालुका पुसद, जिल्हा यवतमाळ सुरेश मानसिंग जाधव ४७ वर्ष, राहणार भोईनी, तालुका मानोरा जिल्हा वाशिम, स्वराज राम राठोड वय ३ वर्ष राहणार सावरगाव, तालुका मानोरा, जिल्हा वाशिम, सदाशिव विष्णू निकष वय ३४ वर्ष राहणार सावत्रा, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा, प्रतीक्षा सदाशिव निकष २८ वर्ष, राहणार सावत्रा, तालुका मेहकर जिल्हा बुलढाणा, सरस्वती गजानन गायकवाड वय ३७ वर्ष राहणार वाशिम, मिना भारत कांबळे ,वय ५०वर्ष राहणार वाशिम,अविनाश भिमराव मोरे राहणार शहापूर तालुका जिल्हा वाशिम,दिपाली अविनाश मोरे वय २६ वर्ष राहणार शहापूर, तालुका जिल्हा वाशिम.
हेही वाचा >>> बंदूकीची एक गोळी आणि कायमचे अपंगत्व.. काय घडले ?
एक तास अडकले प्रवासी!
ट्रॅव्हल्स बस डाव्या बाजूने उलटल्याने प्रवाशी किमान एक तास अपघातग्रस्त बसमध्ये अडकून पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. बसला मागील बाजूला असणारे संकट कालीन दार (मार्ग)नसल्याचेही या सूत्रांनी स्पष्ट केले. मात्र याची पुष्टी झाली नाही.