बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात नोकरी लावून देतो म्हणून तिघांना अठरा लाख रुपयांनी फसविल्याचा प्रकार उजेडात आला आहे. याप्रकरणी नरसिंह रामेश्वर सारसार आर्वी,रजनी अंबादास चौधरी चंद्रपूर, पंकज हरिदास झोडगे अमरावती व अंबादास चौधरी चंद्रपूर यांच्यावर आर्वी पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून चौघेही फरार आहेत.

हेही वाचा >>> नागपूर : आठवीच्या विद्यार्थिनीवर बलात्कार ; नराधम अखेर गजाआड

In last four days pistols and MD powder were seized from four accused in nagpur
नागपुरात अंमली पदार्थांचे तस्कर व पिस्तूल वापणाऱ्यांचा सुळसुळाट! निवडणुकीच्या तोंडावर धामधूम
Fadnavis urged Saoner to change for real development criticizing current politics as bullying
‘या’मतदारसंघात विकासाचे नाही तर दादागिरीचे राजकारण, फडणवीस म्हणतात,‘रेती…
All eyes are on Nagpur South West seat whether Fadnavis or Prafull Guddhe will win
फडणवीसांचा ‘चौकार’ की काँग्रसचे ‘परिवर्तन पर्व’ ?
Congress candidate Dr Nitin Raut said my ministership gone after saying Jai Bhim
जय भीम म्हटल्याने ‘या’ नेत्याची मंत्रीपदाची संधी हुकली ?
After Batenge to Katenge slogan Hindu organizations are urging 100 percent Hindu voter turnout
‘बटेंगे तो कटेंगे’ १०० टक्के मतदानासाठी हिंदू संस्था…
Nitin Gadkari clarified sending Badole to NCP was Fadnavis and his decision not Badoles
बडोलेंना राष्ट्रवादीत पाठवण्याचा निर्णय माझा व फडणवीसांचा, गडकरी
Prakash Ambedkar alleged Congress ignored evidence and did not act on 1992 riots involving Shiv Senappd
काँग्रेसने १९९२ च्या दंगल प्रकरणात कारवाई केली नाही – प्रकाश आंबेडकरांचा गंभीर आरोप
gold price increased today on monday
सोन्याचे दर निच्चांकीवर असतांनाच पुन्हा बदल… हे आहेत आजचे दर…
BJP workers waited four hours for Priyanka Gandhis road show
नवलचं! प्रियंका गांधींच्या ‘रोड-शो’साठी भाजपचे कार्यकर्ते चार तास प्रतीक्षेत का होते?

आर्वीच्या रितेश राजेश टाक यास बुलडाणा जिल्हाधिकारी कार्यालयात शिपाई म्हणून नोकरी लावून देण्याचे आश्वासन नरसिंह सारसार याने दिले.मात्र त्यासाठी रजनी चौधरी यांना पैसे द्यावे लागणार असल्याचे सांगितले.चौधरी वर्ध्यात आल्यावर रितेश हा नरसिंह सोबत त्यांना भेटला.पन्नास हजार रुपये दिल्यावर एक अर्ज भरून घेत दोन फोटोही घेतले.दोन महिन्यानंतर परत रितेशने दोन लाख रुपये दिले. नोकरी बाबत विचारणा केल्यावर सध्या जागा रिक्त नसल्याचे उत्तर त्याला मिळाले. यानंतर आर्वीच्या सावरकर याची साडे आठ लाख रुपयांनी व विरसिंग सारसार याची पाच लाख रुपयांनी फसवणूक झाल्याचे उघडकीस आले. दरम्यान, रितेशला एकदा बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयात बोलाविण्यात आले होते.मात्र तिथे गेल्यावर त्याला आरोपीपैकी एकही जण भेटला नाही.अखेर त्यास हा बनवाबनवीचा खेळ असल्याचे व आपला पैसा लुबाडलल्याचे लक्षात आल्यावर रितेशने आर्वी पोलिसांकडे तक्रार दाखल केली.