मच्छर मारण्याच्या औषधाची बाटली तोंडात घातल्याने दीड वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना सोमवारी सक्करदरा परीसरात उघडकीस आली. रिद्धी दिनेश चौधरी असे मृत मुलीचे नाव आहे. दिनेश चौधरी यांचे औषधालय असून त्यावरील मजल्यावर कुटुंबासह राहतात. त्यांना दोन मुली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> ऐकावं ते नवलच! बदली होताच पोलीस अधिकाऱ्याने ‘एसी’, शौचालयाचा दरवाजाही काढून नेला

रिद्धी ही लहान मुलगी असून ती रविवारी दुपारी साडेबारा वाजता बेडरुममध्ये खेळत होती. तिच्या हाती  मच्छर मारण्याच्या औषधीची बाटली  लागली. तिने तोंडात घातल्यामुळे ती बेशुद्ध पडली. तासाभराने तिची आई बेडरुममध्ये आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. तिच्या वडिलांनी रिद्धीला मेडिकल रुग्णालयात दाखल केले. मात्र दोन तासांनंतर मुलीचा मृत्यू झाला. या प्रकरणी सक्करदरा पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 18 month old baby dies after consuming mosquito repellent adk 83 zws