अमरावती : प्रवाशांच्‍या सुविधेसाठी पुणे-अमरावती-पुणे या विशेष रेल्‍वेगाडीच्‍या १० नोव्‍हेंबर २०२३ ते ११ फेब्रुवारी २०२४ पर्यंत एकूण १८६ फेऱ्या चालविण्‍याचा निर्णय मध्‍य रेल्‍वेने घेतला आहे. ०११०१ क्रमांकाची पुणे-अमरावती एक्‍स्‍प्रेस दररोज सकाळी ११.०५ वाजता पुणे स्‍थानकावरून सुटेल आणि मध्‍यरात्री ००.५५ वाजता अमरावतीला पोहोचेल. ०११०२ क्रमांकाची अमरावती-पुणे एक्‍स्‍प्रेस दररोज अमरावतीहून रात्री २२.५० वाजता निघेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ११.२५ वाजता पुणे येथे पोहोचणार आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – नागपूर : दिवाळीच्या पहिल्याच दिवशी सोन्याचे दर घसरले, आजचे दर पहा..

हेही वाचा – अमरावती : एका किलोमीटरच्या अंतरात किलोमागे ३० रुपयांनी महागतो कांदा

या विशेष रेल्‍वेगाडीला उरळी, दौंड कॉर्ड लाईन, अहमदनगर, बेलापूर, कोपरगाव, मनमाड, चाळीसगाव, काजगाव, पाचोरा, जळगाव, भुसावळ, मलकापूर, शेगाव, अकोला आणि बडनेरा या रेल्‍वे स्‍थानकांवर थांबे देण्‍यात आले आहेत. या रेल्‍वेगाडीला एकूण १७ एलएचबी डबे राहणार असून त्‍यात द्वितीय श्रेणी चेयर कार १३, एसी चेयर कार श्रेणी ०१, स्लीपर श्रेणी ०१, द्वितीय श्रेणी एसएलआरच्‍या २ डब्‍यांचा समावेश आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 186 trips of pune amravati pune special train from 10 november mma 73 ssb