अमरावती‎ : ज्या शेतकरी खातेदारांनी पीएम‎ किसान सन्मान योजनेसाठी नोंदणी‎ केली व आतापर्यंत १२ हप्त्याचा‎ लाभ घेतला, यापैकी तब्बल १९‎ हजार लाभार्थ्‍यांच्या शेतीचा पत्ता‎ अद्याप महसूल विभागाला‎ लागलेला नाही. त्यामुळे हे खातेदार‎ आता योजनेच्या १३ व्या हप्त्याच्या‎ लाभासाठी अपात्र ठरले आहेत.‎ पंतप्रधान किसान सन्मान योजनेत‎ दर चार महिन्यांनी दोन हजारांचा‎ लाभ पात्र खातेदाराला देण्यात येतो.‎

योजनेत अपात्र लाभार्थ्‍यांनी लाभ‎ घेतल्याचे निदर्शनास येताच महसूल‎ विभागाद्वारे सर्वच खातेदारांची‎ पडताळणी करण्यात येऊन त्यांच्या‎ शेतीविषयक नोंदी पोर्टलवर घेतल्या‎ जात आहेत. त्यामुळे एकाच‎ कुटुंबातील अनेकांना लाभ मिळण्याचे बंद झाले आहे.‎ याशिवाय ज्या शेतकऱ्यांच्या जवळ‎ शेती नाही, अशाही काही‎ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती, हे‎ आता निदर्शनास आल्याने त्यांना‎ लाभ मिळणे या हप्त्यापासून बंद‎ झाले आहे. या योजनेद्वारे सन २०१९‎ पासून नोंदणी केलेल्या शेतकरी‎ खातेदाराला वर्षाला तीन हप्त्यांमध्ये‎ प्रत्येकी सहा हजारांचा लाभ दिल्या‎ जातो. ३.३९ लाख खातेदारांनी या‎ योजनेसाठी नोंदणी केली होती. या‎ खातेदारांची शेतीविषयक माहिती‎ आता महसूल विभागाच्या क्षेत्रीय‎ यंत्रणेद्वारा नोंदवली जात आहे.‎

zilla parishad loksatta
राज्यातील सहा जिल्हा परिषद, ४४ पंचायत समितींवर ‘प्रशासक राज’; मुदतवाढ नाहीच
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Thane Municipal Corporation prepares water supply plan for next 30 years amid urbanization
अवाढव्य वाढलेल्या ठाण्याची तहान वाढीव पाणी पुरवठा भागवेल का?
soybean procurement deadline extension news in marathi
सोयाबीन खरेदीस ३१ जानेवारीपर्यंत मुदतवाढ; मुख्यमंत्र्यांची मागणी केंद्रीय कृषीमंत्र्यांकडून मान्य
Land revenue exemption continues for heirs of Chhatrapati Shivaji Maharaj including Udayanraje Bhosale
उदयनराजेंसह वारसांना जमीन महसूल सूट कायम, राज्य शासनाचा निर्णय
Central government decision farming Relief
दहा वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा; जाणून घ्या, केंद्र सरकारने २०१४ नंतर पहिल्यांदाच कोणता निर्णय घेतला?
devendra fadanvis
३५०० एकर जमिनीचे १०० दिवसांत वितरण; ‘एमआयडीसी’च्या भूखंडांबाबत मुख्यमंत्र्यांचे आदेश
Mumbai Municipal Corporation owes Rs 16500 crore to the government mumbai news
सरकारकडे मुंबई पालिकेचे साडेसोळा हजार कोटी थकीत; सहाय्यक अनुदान, पाणीपट्टी, मालमत्ता कराचा समावेश

हेही वाचा – “मोदी, फडणवीस यांची अवस्था डोळे मिटून दूध पिणाऱ्या मांजरासारखी”; ईडी कारवाईवरून पटोलेंची टीका

हेही वाचा – होळीसाठी नागपूर- पुणे एसी रेल्वेगाडी

या योजनेचा लाभ घेण्यासाठी नियमानुसार प्राप्तिकर भरणारे, केंद्र किंवा राज्य सरकारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थेतील अधिकारी, कर्मचारी, सनदी लेखपाल आदी व्यक्ती या योजनेसाठी पात्र ठरू शकत नाहीत. काही राज्यांत या योजनेंतर्गत निकषात न बसणाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले. या पार्श्वभूमीवर केंद्राकडून या योजनेसाठी लाभार्थ्यांना ओळख पडताळणी प्रक्रिया (केवायसी) आणि आधार प्रमाणीकरण करण्याचा निर्णय घेण्‍यात आला. राज्‍यातील इतर जिल्ह्यातही अनेक अपात्र व्यक्तींनी या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आले आहे.

Story img Loader