सिंदखेडराजा तालुक्यातील साखरखेर्डा पोलीस ठाणे अंतर्गत येत असलेल्या मलकापूर पांग्रा येथील श्रीयान पेट्रोल पंपावर दरोडा घालून अडीच लाखांची लूट करण्यात आली. रविवारी २० नोव्हेंबरला रात्री साडेनऊ वाजताच्या दरम्यान ही खळबळजनक घटना घडली.

हेही वाचा- अमरावती: राज्यपालांसह भाजप प्रवक्त्यांच्या छायाचित्राला जोडे मारले, काँग्रेस आक्रमक

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
पुन्हा ‘३७० कलम’ राहुल गांधींना आता कायमचे अशक्य- अमित शहा यांचे काँग्रेसवर टीकास्र
pune police arrested three for stealing mobile phones
मोबाइल चोरणाऱ्या सराइतांना अटक; १२ मोबाइल संच जप्त; ९ गुन्हे उघड
cash seized south mumbai ahead of assembly elections in maharashtra
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईत कारवाई ; सव्वा दोन कोटींची रोख जप्त
Nagpur pollution latest news
दिवाळीत फटाके फुटले तरी प्रदूषण कमी, मात्र दिवाळी आटोपताच उपराजधानीत…..

चारचाकी गाडीतून आलेल्या चार दरोडेखोरांनी पेट्रोल भरण्याचा बहाणा करून केबिनमध्ये प्रवेश केला. आत झोपलेल्या कर्मचाऱ्यांना जबर मारहाण करून केबिनमध्ये असलेले अडीच लाख रुपये लुटून नेले. घटनेची माहिती मिळतात साखरखेर्डा, बीबी व किनगाव राजा येथील पोलीस घटनास्थळी दाखल झाले. दरोडेखोर व त्यांचे वाहन सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. दरम्यान, पोलिसांनी नाकेबंदी केली असून पोलीस दरोडेखोरांच्या मागावर आहेत. दरम्यान, मलकापूर पांग्रा पेट्रोल पंप लुटल्यानंतर ते सुलतानपूर येथील कालिंका पेट्रोल पंपावर दरोडा टाकत असताना तेथील कर्मचारी आणि दरोडेखोरात झटापट झाली. कर्मचाऱ्यांनी प्रतिकार करताच दरोडेखोर घटनास्थळीच चोरीची गाडी सोडून पसार झाले. या झटापटीत एक दरोडेखोर जखमी झाल्याची माहिती आहे.

हेही वाचा- वैदर्भीय बेरोजगारांची फरफट; ४१३२ बेरोजगारांची नोंदणी, मात्र, नोकरी ३४७ जणांना

घटनास्थळी रात्रीच उपविभागीय पोलीस अधिकारी विलास यामावार यांनी भेट दिली असून आज, सोमवारी अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, मेहेकर ठाणेदार निर्मला परदेशी यांनीही घटनास्थळाची पाहणी केली आहे. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून चार दरोडेखोर हे याच भागातील असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. लवकरच आरोपींना जेरबंद करण्यात येईल असा विश्वास साखरखेर्डाचे ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी व्यक्त केला आहे.