बुलढाणा : दोघे बालमित्र पोहण्यासाठी गावानजीकच्या धरणावर गेले. पाण्याचा अंदाज न आल्याने पाण्यात बुडून व गाळात फसून दोघांचा मृत्यू झाला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

चिखली तालुक्यातील करवंड परिसरात मंगळवारी संध्याकाळी ही दुर्दैवी घटना घडली. एकाच गावातील रहिवासी व जिवलग मित्र असलेल्या या बालकांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अनिकेत गजानन जाधव व आदित्य नारायण जाधव (दोन्ही राहणार करवंड, ता. चिखली) अशी मृतांची नावे आहेत. ते अनुक्रमे चौथी व पाचवीचे विद्यार्थी होते.

हेही वाचा >>> पुन्हा भिर्रर्र..! वर्धा जिल्ह्यात बैलगाडा शर्यती रंगणार

हे दोघे पोहण्यासाठी गावानजीकच्या धरणात पोहायला गेले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले व गाळात फसून दगावले. तलावावर जनावरांना पाणी पाजण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला काठावर कपडे व चपला दिसल्याने त्याने गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी धरणाकडे धाव घेतली. शालिग्राम गवई हिंमत करून पाण्यात उतरले असता त्यांना गाळात फसलेले दोन्ही बालकांचे मृतदेह आढळून आले. दोघांना पाण्याबाहेर काढण्यात आले. मंगळवारी रात्री उशिरापर्यंत कायदेशीर कारवाई करून मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. अनिकेतवर मंगळवारी रात्री तर आदित्यवर आज बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 2 children drown in dam near the village in chikhli taluka scm 61 zws