लोकसत्ता टीम
नागपूर : आयुष्यभर राबल्यानंतरही दोन कोटी कमवू शकत नाही. मात्र, त्यांच्या बँक खात्यातून दोन कोटीं काढण्यात झाले. जरीपटका पोलिस ठाण्याअंतर्गत हा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी विरुध्द गुन्हा नोंदविला आहे. बबलू जाधव (२८) आणि निखील जाधव (२६) दोन्ही रा. कपिलनगर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी बबलू जाधवला अटक केली आहे.
समर्थनगर, उप्पलवाडी येथील रहिवासी फिर्यादी मोहन दोडेवार (२५) ह.मु. कुशीनगर हा मजुरी करतो. आरोपी तीन भाऊ आहे श.त्यांचे वडिल ट्रक चालक आहेत तर आई गृहीणी आहे. आरोपी हे मोहनला आधीपासूनच ओळखतात. त्याच्या गरीबीची फायदा घेत आरोपींनी त्याला जाळ्यात ओढले. बँकेत खाते उघडण्याची योजना सुरू आहे. आम्ही सांगितलेल्या बँकेत खाते उघडल्यास प्रत्येक महिण्याला दहा हजार रुपये मिळतील, असे आमिष दिले. मोहन त्यांच्या आमिषाला बळी पडला. मोहनने त्यांनी सांगितलेल्या एचडीएफसी बँक (शाखा टेकानाका), कॅनरा बँक (जरीपटका), आयसीआयसीआय बँक (जाफरनगर) आणि इसाफ बँक (पाटनकर चौक) या चार शाखेत बँक खाते उघडले. नंतर आरोपींनी त्याच्या जवळून बँक पासबूक, एटीएम आणि चेक बुक घेतले. मात्र, कबूल केलेली रक्कम मोहनला दिली नाही. दरम्यान मोहनच्या बँक खात्यातील मोबाईल नंबरही बदलविला.
आणखी वाचा-चंद्रपूर: महापालिका क्षेत्रातील १८०० श्वानांची नसबंदी
तसेच मोहनने बँक खात्याविषयी माहिती विचारली असता ते टाळाटाळ करू लागले. त्यामुळे मोहन स्वत: बँकेत गेला. एचडीएफसी बँक खात्यात एक कोटी आणि कॅनरा बँकेत एक कोटी असा दोन कोटींचा व्यवहार झाल्याचे कळताच त्याच्या पायाखालची वाळू सरकली. यासंदर्भात मोहनने आरोपींना विचारले असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. त्यामुळे तो पोलिसांकडे गला. जरीपटका पोलिसांनी गुन्हा नोंदवून सखोल तपास केला आणि आरोपी बबलूला अटक केली. त्याला न्यायालयाने त्याला १४ ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले