वाशिम : निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांची समिती कुणबी नोंदी तपासणीसाठी विदर्भाच्या दौऱ्यावर असल्यामुळे जिल्ह्यात कुणबी नोंदी शोधण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे. वाशीम जिल्ह्यातील सहा तहसील अंतर्गत २ लाख ५ हजार ६४२ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत.
हेही वाचा – वर्धा : पोलीस विभागाचा पेट्रोल पंप हटवा अन्यथा…; आंबेडकरी जनतेचा इशारा
हेही वाचा – उच्च न्यायालय डिजिटल होणार, ‘पेपरलेस’कडे वाटचाल…
जिल्ह्यातील सहाही तहसील कार्यालयात यासाठी विशेष कक्ष स्थापन करण्यात आले असून आत्तापर्यंत २२ लाख ६५ हजार ३८९ कागदपत्रे तपासण्यात आली आहेत. ज्यामध्ये २१ नोव्हेंबरपर्यंत २ लाख ५ हजार ६४२ कुणबी नोंदी आढळून आल्या आहेत. विशेष म्हणजे, काही ठिकाणी एकाच गावातील भावकी असलेल्या काही जणांच्या नोंदी कुणबी तर काही मराठा, अशा आहेत. २४ नोव्हेंबरपर्यंत जिल्ह्यातील नागरिकांकडे असलेले पुरावे सादर करण्याचे आवाहन प्रशासनाने केले असल्यामुळे यामध्ये आणखी भर पडण्याची शक्यता व्यक्त केली जात असून नोंदी तपासण्याचे काम वेगाने सुरू आहे.