बुलढाणा : तालुक्यातील पिंपळगाव सराई येथील सैलानी बाबांच्या दर्ग्यावर नवस फेडण्यासाठी येणाऱ्या भाविकांचे वाहन उलटून झालेल्या अपघातात २० प्रवासी जखमी झाले. यातील गंभीर जखमींना बुलढाणा जिल्हा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. जखमी जालना जिल्ह्यातील  काठोरा बाजार येथील राहिवासी आहेत. टाटा ४०७ या वाहनाने ते सैलानीकडे येथे येत असताना बुलडाणा तालुक्यातील ढासाळवाडी जवळच्या वळणावर वाहन उलटले. जखमींमध्ये प्रामुख्याने महिला आणि बालकांचा समावेश आहे. जखमींना ढासाळवाडी ग्रामस्थ व  रायपूर पोलिसांनी येथील जिल्हा  रुग्णालयात दाखल केले

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 devotees injured after vehicle coming for sailani baba darshan overturned scm 61 zws