चंद्रपूर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शुक्रवारी दोन – लाचखोरांना दोन वेगवेगळ्या कारवाईत अटक केली. विशेष म्हणजे एका लाच प्रकरणात वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये लाचेची मागणी करण्यात आली.राजुरा तालुक्यातील शेतकऱ्याने – शेतात पाणीपुरवठा करण्यासाठी विद्युत पंपाची – व्यवस्था केली होती. मात्र, पंपासाठी थ्री फेज विद्युत पुरवठा असण्याची गरज असते. फिर्यादी व इतर शेतकऱ्यांचे शेत विरुर महावितरण कार्यालय अंतर्गत येते व विद्युत पुरवठा सुरळीत चालू ठेवण्याचे काम राजुरा उपविभागाचे वरिष्ठ तंत्रज्ञ शालेंद्र देवराव -चांदेकर यांच्या अंतर्गत येते. विद्युत पुरवठा सुरळीत -सुरू ठेवण्यासाठी चांदेकर यांनी फिर्यादी व इतर शेतकऱ्यांना प्रत्येकी २० किलो तांदूळ व दीड हजार रुपये असे एकूण ७ हजार ५०० रुपयांची मागणी केली होती. पैसे देण्याची इच्छा नसलेल्या फिर्यादीने – लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली. – शुक्रवारी चंद्रपूर लाचलुचपत विभागाने सापळा रचत ५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना शालेंद्र चांदेकर यास अटक केली. आरोपी विरुद्ध बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तक्रारीची पडताळणी झाल्यावर चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला, तडजोडीअंती ग्रामसेवक टेंभुर्णेला लाचेची रक्कम स्वीकारताना अटक केली. ही कारवाई पोलिस निरीक्षक जितेंद्र गुरनुले, संदेश वाघमारे, वैभव गाडगे, राकेश जांभुळकर, रोशन चांदेकर, मेघा मोहूले, हिवराज नेवारे, प्रदीप ताडाम, पुष्पा काचोळे यांनी केली. दुसऱ्या प्रकरणात ब्रह्मपुरी तालुक्यातील झिलबोडीचे ग्रामसेवक पुरुषोत्तम यशवंत टेंभुर्णेला १० हजार स्वीकारताना अटक करण्यात आली. फिर्यादी ठेकेदारीचे काम करतो. जि. प. अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून २०२१ ते २०२२ दरम्यान जि. प. प्राथमिक शाळेचे शौचालय, मुतारी, घर बांधकाम व अंगणवाडी शौचालय, किचन शेड व मुतारीचे काम केले होते. त्या कामाचे फिर्यादीला ३ लाख ९० हजार रुपये ग्रामसेवक टेंभुर्णेयाने धनादेशद्वारे दिले होते. याचा मोबदला म्हणून १५ हजाराची लाच मागितली. फिर्यादीने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली होती. त्यानंतर ही कारवाई केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 20 kg of rice was demanded as a bribe from the farmer to keep power supply in chandrapur rsj 74 amy
Show comments