‘इंस्टाग्राम फ्रेंड’ने १७ वर्षीय मुलीशी मैत्री करून तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला लग्नापूर्वी हनिमून करण्याचे आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. यातून मुलगी तीन महिन्यांची गर्भवती झाली. मुलीचे पोट बघून आईच्या लक्षात आले. त्यावेळी ‘इंस्टाग्राम फ्रेंड’च्या कुकृत्याचा भंडाफोड झाला. नंदनवन ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली असून पोलिसांनी तक्रारीवरून आरोपी तरुण अभिषेक कमलाकर डोंगरे (१९) रा. सद्भावनानगर, नंदनवन याला अटक केली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> सोन्याच्या दरात निच्चांकी, नागपुरात आजचे ‘हे’ आहे दर

अभिषेक डोंगरे हा एका खासगी रुग्णालयात नोकरी करतो. ऑक्टोबर २०२२ मध्ये इंस्टाग्रामवर अभिषेकने मुलीला मॅसेज केला. त्यानंतर दोघांमध्ये संवाद होऊ लागला. अभिषेकने तिला प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तिला आपल्या घरी बोलावून लैंगिक शोषण केले. काही दिवसांपूर्वी मुलीची  प्रकृती बिघडली. कुटुंबीयांनी तिला डॉक्टरकडे नेले. डॉक्टरांनी तपासले असता मुलगी गर्भवती असल्याचे समोर आले. कुटुंबीयांनी मुलीला याबाबत विचारणा केली असता तिने अभिषेकबाबत सांगितले. नंदनवन पोलिसात तक्रार करण्यात आली. पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा नोंदवून अभिषेकला अटक केली. न्यायालयाने त्याला पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.