लोकसत्ता टीम
चंद्रपूर : औद्योगिक जिल्हा असलेल्या चंद्रपुरात कामगारांची संख्या लक्षात घेता कामगारांसाठी २०० खाटांचे रुग्णालय सुरू करण्याचे वचन देतो अशी माहिती केंद्रीय पर्यावरण, वने, श्रम व रोजगार मंत्री भूपेंद्र यादव यांनी दिली. काँग्रेस पक्ष ओबीसी विरोधी असल्याची टीका केली.
भाजपा द्वारा प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांच्या ९ वर्षपूर्ती कार्यकाळाच्या अनुशंगाने मोदी @ 9 महाजनसंपर्क अभियान अंतर्गत चंद्रपूर लोकसभा क्षेत्रात केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव दौऱ्यावर आहेत. आज येथे आयोजित पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री यादव यांनी मोदी सरकारच्या नऊ वर्षातील काळात झालेल्या विकास कामांची माहिती दिली. खासदार डॉ.कल्पना सैनी, राज्याचे वन व सांस्कृतिक मंत्री तथा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, मागासवर्गीय आयोग अध्यक्ष हंसराज अहिर, आमदार संजय उके, देवराव भोंगळे, मंगेश गुलवाडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पत्र परिषद मध्ये यादव यांनी प्रधानमंत्री मोदी यांच्या कार्यकाळात विदेशात भारताची प्रतिष्ठा वाढल्याचे सांगितले.
आणखी वाचा-अमरावती : शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या जागेवरून राजकारण तापले; रवी राणांवर भाजपामधूनच टीका
२०१४ नंतर जनसामान्य मध्ये आत्मनिर्भरतेचा भाव निर्माण झाला आहे. काँग्रेस सरकारच्या काळात सुशासन नव्हते. सरकार विकास कामासाठी निधी पाठवीत होता. मात्र जमीन स्तरावर निधी पोहचत नव्हता. काँग्रेस काळात गव्हर्नसची कमी होती, मात्र मोदी सरकार गरिबाच्या कल्याणासाठी काम करत आहे. नऊ वर्षात सर्वात मोठे संकट कोविड होते. भारताने स्वदेशी लस तयार केली, २०० करोड लस वितरण केले. जगातील अन्य देशालाही लस पुरवठा केला. त्याचा परिणाम आज विदेशी धर्तीवर प्रधानमंत्री मोदी यांचे कौतुक होत आहे. गरिबांसाठी प्रधानमंत्री घरकुल योजना अंतर्गत साडेतीन करोड घर निर्माण केले, ११ करोड ७२ लाख शोचालय निर्माण केले. १२ कोटी नळ पाणी पुरवठा जोडणी दिल्या, ८० कोटी जनतेला धान्य पुरवठा, जन औषधी केंद्र, पाच लाख आरोग्य विमा, जनधन खात्यामुळे १०.३० कोटी शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले गेले. काँग्रेस पक्ष ओबीसी विरोधी आहे. मंडल आयोग रिपोर्ट काँग्रेसने लागू केली नाही, पंतप्रधान मोदी यांनी येताच ओबीसी आयोग लागू केला. मंत्रायल स्थापन केले.
आज बंगालमध्ये मुस्लिमचा समावेश मुख्यमंत्री ममता बॅनर्जी ओबीसी समाजात चुकीच्या पद्धतीने करत आहे. हंसराज अहिर यांनी ही बाब उघडकीस आणली आहे. तेलंगणा, राजस्थान मध्ये देखील हाच प्रकार सुरू आहे. आज ओबीसी समजासोबत खुल्या प्रवर्गाला १० टक्के आरक्षण, अपंगला सर्व लाभ दिले जात आहे. सेवा , सुशासन, गरीब कल्याण या मंत्रावर मोदी सरकारचे काम सुरू आहे. मोदी सरकारच्या काळात १५ शहरात मेट्रो , जल रस्ते निर्माण केले, ७४ शहरात नवीन विमानतळ झाले., ७०० नवीन मेडिकल कॉलेज, ६३ हजार नवीन वैद्यकीय जागा, ७ आयआयएम, ३९९ नवीन विद्यापीठ निर्माण केले, जगात आज भारत पाचवी अर्थव्यवस्था आहे असेही यादव यांनी सांगितले. राम मंदिराचे निर्माण केले. भारताने १ लाख करोड रक्षा उत्पादन केले आहे. युद्ध काळात १९ हजार भारतीयांना सुरक्षित भारतात आणले, २ करोड भारतीयांना कोविड काळात भारतात वापस आणले. भारत जी 20 चा अध्यक्ष आहे. २०१४ नंतर 2 हजार किलोमीटर जंगल वाढले आहे. वाघांच्या विषयावर वन मंत्रालय संवेदनशील आहे असेही यादव यांनी सांगितले.