लोकसत्ता टीम

वर्धा: स्वस्त वाळूचे दुकान सुरू होवूनही काळा बाजार थांबत नसल्याचे चित्र आहे. याची कुणकुण लागताच जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांनी गोपनीय माहिती घेणे सुरू केले.

हिंगणघाट येथे मोहता मील परिसरात अवैधपणे साठवलेला वाळू साठा असल्याची माहिती त्यांना मिळाली. गोपनिय माहिती प्राप्त झाल्यानंतर अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या पथकाने धाडीची कारवाई केली. सर्व साठा जप्त करुन तहसिलदाराच्या ताब्यात देण्यात आला आहे. यातील दोषी व्यक्तींविरुध्द गुन्हे दाखल करण्याची कारवाई सुरु आहे.

हेही वाचा… यवतमाळ: वडिलांच्या मृत्यूनंतरही न खचता वैष्णवीची ‘नीट’ परिक्षेत गगनभरारी; शिकवणी वर्ग न लावता मिळविले ७०० गुण

जिल्हाधिकाऱ्यांनी अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांच्या पथकास हिंगणघाट येथे जावून तातडीने कारवाई करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार नरेंद्र फुलझेले व त्यांच्या पथकातील नायब तहसिलदार अतुल रासपायले, अव्वल कारकुन अमोल उगेवार यांनी तातडीने ही कारवाई केली. हिंगणघाट येथे पोहोचल्यानंतर उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनाले व तहसिलदार सतिश मासाळ यांना कारवाईत सहभागी करुन घेण्यात आले.

हेही वाचा… वर्धा : मद्यधुंद अधिकारी, कर्मचाऱ्यास ग्रामस्थांनी धू… धू… धुतले, सहकाऱ्यांनी काढला पळ; कारण काय, वाचा…

अप्पर जिल्हाधिकाऱ्यांचे पथक मील परिसरात पोहोचल्यानंतर तेथे ठिकठिकाणी अवैधपणे वाळू साठविल्याचे आढळून आले. हा सर्व साठा जप्त करण्यात आला. जप्त साठा हिंगणघाट तहसिलदार सतिश मासाळ यांच्या ताब्यात देण्यात आला आहे. वाळूचा साठा करणाऱ्यांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहे. असे असले तरी अज्ञात व्यक्ती विरुध्द गुन्हा नोंद करण्याची कारवाई केली जात आहे.

हेही वाचा… विदर्भातही शिंदे गटाच्या विरोधात भाजपमध्ये खदखद वाढली

शासनाच्या नव्या धोरणाप्रमाणे नोंदणी करुन लाभार्थ्यांना वाळू उपलब्ध करुन दिली जात आहे. जप्त करण्यात आलेला हा वाळू साठा नोंदणी केलेल्या व प्रतिक्षा यादीत असलेल्या घरकुल लाभार्थ्यांना विनामुल्य उपलब्ध करुन देण्यात येणार असल्याचे अप्पर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले यांनी सांगितले. जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई करण्यात आली आहे. वाळू साठा करणाऱ्या व्यक्ती विरुध्द कारवाई करण्याची सुचना देखील करण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

Story img Loader