वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभाग भरती करणार आहे. दोन हजारांवर जागा भरल्या जात आहेत. त्यात कनिष्ठ अभियंता स्थापत्य या वर्गातील ५३२ तर स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक वर्गातील १ हजार ३७८ जागा भरणे आहे. तसेच कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ वास्तूशास्त्रज्ञ, लघुलेखक, उद्यान पर्यवेक्षक, वाहनचालक, स्वछक, शिपाई व अन्य पदेपण भरल्या जाणार आहेत.
हेही वाचा – नागपूर : फुटाळाच्या संगीत कारंज्याचे काय होणार? ‘या’ तारखेला निर्णय
नियमानुसार कनिष्ठ अभियंता पदासाठी पदविका धारक पात्र आहेत. पण पदवीधर अपात्र आहेत. तर अभियांत्रिकी सहाय्यक पदासाठी पदवीधर आणि त्यापेक्षा अधिक शिक्षण घेतलेले पात्र ठरविण्यात आले आहे. हा अन्याय असल्याची भावना व्यक्त होत आहे. सहा नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज करायचा आहे. शुल्क भरण्यासाठी ७ नोव्हेंबरपर्यंत मुदत देण्यात आली आहे. परीक्षेचा दिनांक महापीडब्लूडी या संकेतस्थळावर उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. प्रत्येक संवर्गासाठी स्वतंत्र अर्ज भरायचा आहे.