वर्ध्यालगत भूगांव येथील  इवोनिथ स्टील कंपनीत बुधवारी रात्री स्फ़ोट झाला. त्यात २१ कामगार गंभीर जखमी झाले. यापैकी गंभीर  तिघांना रात्रीच नागपूरला अधिक उपचारासाठी पाठवण्यात आले आहे. तर काहींवर सेवाग्राम व सावंगी येथील रुग्णालयात उपचार सूरू आहे. ही घटना रात्री आठच्या सुमारास घडली असल्याचे सांगण्यात येते.

हेही वाचा >>> लोकजागर: रिपब्लिकनांची बोळवण!

Pune Fire incidents, Diwali pune, pune,
पुणे : दिवाळीत ६० ठिकाणी आगीच्या घटना
Aries To Pisces 6th November Horoscope
६ नोव्हेंबर पंचांग: चारचौघात कौतुक, अचानक धनलाभ, जन्मराशीनुसार…
Ants the World’s First Farmers?
Ant Farmers: ६६ दशलक्ष वर्षांपूर्वी मानवाने नाही तर ‘या’ कीटकाने केली शेतीला सुरुवात; नवीन संशोधन काय सांगते?
pune video
वाढीव पुणेकर! एवढे उत्साही लोक फक्त पुण्यातच भेटतात, पठ्ठ्याने कारला केली लायटिंग, Video Viral
Number of people injured while bursting firecrackers on Diwali rises to 49 mumbai print news
दिवाळीत फटाके फोडताना जखमी झालेल्यांची संख्या ४९ वर
issue of air and noise pollution increase in Thane during Diwali
ठाण्यात दिवाळी काळात हवा आणि ध्वनी प्रदुषणात वाढ, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत प्रदुषणात घट झाल्याचा पालिकेचा दावा
Started the business of selling organic eggs
Success Story : मेहनत व जिद्दीच्या जोरावर सुरू केला सेंद्रिय अंडी विकण्याचा व्यवसाय; आज वर्षाला करतात करोडोंची कमाई
Massive pollution due to firecrackers during Diwali
फटाक्यांच्या विषारी धुरामुळे श्वास कोंडला!

 बॉयलर मध्ये स्फ़ोट झाल्याची चर्चा होती. पण ती खोटी असून एक यंत्रात असलेल्या स्लॅकपिटचा पाण्याशी संबंध आला. त्यामुळे गॅस तयार होऊन भडका उडाला, असा खुलासा कंपनीचे व्यवस्थापक जवदंड यांनी केला आहे. दिवाळीपूर्वी एक नवा प्रोजेक्ट त्याच कारखान्यात सूरू करण्यात आळा होता. त्यात ही घटना घडल्याची माहिती मिळाली आहे. कारखान्यात पोलाद तयार करण्याचे काम होते . गरम पाणी थंड करण्याची प्रक्रिया करणारे यात प्रामुख्याने भाजल्या गेले. भडका उडल्यावर जवळच असलेले २१ कामगार भाजल्या गेले. त्यापैकी तिघांना आगीचा मोठा फटका बसला आहे. त्यांना अधिक चांगले उपचार मिळावे म्हणून नागपूरला शिफ्ट करण्यात आले. त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. तर सावंगी व सेवाग्राम येथे दाखल जखमी कामगारांना आज उपचार झाल्यावर सुट्टी देण्यात येईल.

हेही वाचा >>> राज ठाकरे म्हणतात, “एकाही मशिदीवर भोंगा दिसणार नाही”

दोघांना निगराणी म्हणून रुग्णालयात ठेवण्यात आले असल्याची माहिती जवदंड यांनी दिली. बहुतांश कामगार बाहेरगावचे आहे. जखमी कामगारांची पूर्ण देखभाल कारखाना व्यवस्थापन करणार असल्याची खात्री देण्यात आली. जखमीत मिलू पटेल, प्रभू दयाल पटेल, दीपक कुमार, सचिन काळे, मोहम्मद कुरेशी, रामसेन कुमार, अमित कुमार पटेल, मनोज कुमार साहू, आकाश मस्कार, अमित पांडे, सचिन फटिंग, दीपक कुमार, राकेश विश्वकर्मा, रवींद्र विश्वास, दिलीप पटेल, अरुण कुमार, राजू राम, ओम हरणे, संजय भोयर, धर्मराज डोळसकर यांचा समावेश आहे. सर्व २२ ते ४२ वयोगटातील आहेत. सुरक्षेबाबत कसलीच तडजोड केली जात नसून आवश्यक ती सर्व खबरदारी इवोनिथ लॉजिस्टिक कंपनी व्यवस्थापन घेते. मात्र तरी पण कधी कधी आकस्मिक घटना घडतात. काय चुकले त्याची चौकशी करू, असा दावा कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. सावंगी पोलिसांनी घटना घडताच आवश्यक ती तपासणी केली. घटना घडली असली तरी कारखाना सर्व ते उपाय करीत सुरूच राहणार असल्याची माहिती देण्यात आली.