लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपूर: भंडारा जिल्ह्यातील जवाहर नगर आयुध निर्माणीत सकाळी १० वाजता भीषण स्फोट झाला. यामध्ये आतापर्यंत आठ कामगारांचा मृत्यू झाल्याची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तर काही उमेदवार जखमी असून त्यांच्यावर भंडारा येथील खासगी रुगणालयात उपचार सुरू आहे. मृतांमध्ये २१ वर्षीय अंकित बारई या तरुणाचा मृत्यू झाला.

जवाहरनगर जवळील साहूली गावच्या अंकितच्या मृत्यूच्या बातमीने संपूर्ण गावात शोककळा पसरली आहे. अंकित २१ वर्षाचा असून सध्या पेट्रोलपंप ठाणा येथील कला व वाणिज्य महाविद्यालयात वाणिज्य शाखेच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होता. काही महिन्यांपूर्वी जवाहर नगर आयुध निर्माणीमध्ये शिकाऊ उमेदवार म्हणजे ‘अप्रेन्टिशिप’साठी जागा निघाल्या. या कंपनीमध्ये अनेक उमेदवार ‘अप्रेन्टिशिप’ करून पुढे नोकरीला लागतात. त्यामुळे अंकितचीही तीच मनीषा होती. अंकितचे वडील भूषण बारई हे सुद्धा जवाहरनगर आयुध निर्माणीमध्ये अनेक वर्षांपासून कंत्राटी पद्धतीने नोकरी करतात. मुलगा अंकितला शिकाऊ उमेदवार म्हणून अनुभव मिळाल्यास त्याचाही भविष्यात येथे नियमित नोकरीची संधी मिळेल अशी वडीलांची इच्छा होती. त्यानुसार अंकितनेही ‘अप्रेन्टिशिप’ करायला सुरुवात केली.

अप्रेन्टनशीप करणाऱ्या सर्व उमेदवारांना कंपनीमधील विविध भागांचा अनुभव दिला जातो. स्फोट झालेल्या कंपनीमध्ये अंकित कामाचा अनुभव घेत होता. परंतु, शुक्रवारी झालेल्या स्पोटात अंकितला जीव गमवावा लागला. अंकितला एक मोठी बहिण आणि एक भाऊ आहे. अंकितच्या काही मित्रांशी संवाद साधला असला तो अगदी साधा मुलगा होता असे सर्वांनी सांगितले. बारावीचे शिक्षण होताच आपल्या हाताला काहीतरी काम हवे अशी त्याची इच्छा होती. शासकीय नोकरी मिळवावी या आशेने अंकित काम करत होता असे त्याच्या काही मित्रांनी सांगितले. नियमितरित्या आयुध निर्माणमध्ये जाणे आणि सोबतच बी.कॉमचा अभ्यास करणे अशी दुहेरी जबाबदारी अंकित सांभाळत होता असेही त्याचे मित्र सांगतात. अंकित गेला या बातमीने सर्वांना प्रचंड वेदना दिल्याचे त्याचे मित्रांनी सांगितले.

मृत कामगार

१)चंद्रशेखर गोस्वामी (५९ वर्षे )
२) मनोज मेश्राम (५५ वर्षे )
३)अजय नागदेवे (५१ वर्षे )
४)अंकित बारई (२० वर्षे )

जखमींची नावे

१)एन पी वंजारी (५५ वर्षे )
२)संजय राऊत( ५१ वर्ष )
३) राजेश बडवाईक (३३ वर्षे )
४) सुनील कुमार यादव( २४ वर्षे )
५) जयदीप बॅनर्जी (४२ वर्षे

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 21 year old apprentice ankit barai died in an explosion at jawahar nagar ordnance factory in bhandara dag 87 mrj