भंडारा : फेसबुक मैत्रीचे रुपांतर प्रेमात व नंतर लग्नाचे आमिष दाखवून तरूणीवर अत्याचार केल्याप्रकरणी पवनी पोलिसांनी वाही येथील एका तरुणावर गुन्हा दाखल केला आहे. शुभम क्रिष्णा खोब्रागडे (२१) असे गुन्हा दाखल केलेल्या तरुणाचे नाव आहे.
हेही वाचा >>> खळबळजनक! चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष रावत यांच्यावर गोळीबार
पीडिता लाखांदूर तालुक्यातील असून, शिक्षणासाठी साकोलीला होती. फेसबुकवरून आरोपीसोबत पीडित मुलीची ओळख झाली. ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले. तिला गोसीखुर्द प्रकल्प पाहण्यासाठी चार महिन्यापूर्वी बोलावून घेतले. प्रत्यक्ष भेटीनंतर त्यांची मैत्री अधिक घट्ट झाली. प्रेम व त्यानंतर लग्न करण्याचा आणाभाका दोघांनी घेतल्या. यातून त्याने तरुणीवर वारंवार अत्याचार केला. पण ऐनवेळी मुलाने लग्न करण्यास नकार दिला.
हेही वाचा >>> चंद्रपूर: बदनामीची धमकी देत विवाहित महिलेवर लैंगिक अत्याचार
मैत्रीत दुरावा निर्माण झाला. अखेर प्रकरण पोलीसांत पोहोचले. तरुणीच्या तक्रारीवरून पवनी पोलिसांनी शुभमविरुद्ध गुन्हा दाखल करून अटक केली. तपास उपविभागीय पोलिस अधिकारी सुशांत सिंग यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक नरेंद्र निस्वादे करीत आहेत.