लोकसत्ता टीम

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

वर्धा : लोकसभा निवडणूकीत ठराविक मते प्राप्त न झाल्याने २२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे. लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासह अनामत रक्कम जमा करावी लागते. खुल्या गटातील उमेदवारास २५ हजार रुपये तर अनुसूचित जाती व जमाती वर्गातील उमेदवारांना ५० टक्के म्हणजे साडे बारा हजार रुपये अर्जंसोबत भरावे लागतात.

मात्र, ही रक्कम ठरावीक मते प्राप्त न झाल्यास जप्त करण्याची म्हणजे शासन जमा करण्याची तरतूद आहे. लोकसभा निवडणूकीत नोटा वगळून नोंदविण्यात आलेल्या एकूण वैध मतांच्या एक षष्ठांश मते प्राप्त न झाल्याने २२ उमेदवारांची अनामत रक्कम जप्त करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल कर्डिले यांनी स्पष्ट केले.

आणखी वाचा-पुणे, मुंबईत ओबीसी वसतिगृहांना इमारती मिळेना, जाणून घ्या कारण…

यात बहुजन समाज पक्ष तसेच वंचीत आघाडीच्या उमेदवारांचाही समावेश आहे. वर्धा लोकसभा निवडणूकीत नोटा वगळून १० लाख ९० हजार ३७८ मतांची नोंद झाली. त्यापैकी अपेक्षीत १ लाख ८१ हजार ७३० मते प्राप्त न झाल्याने उमेदवारांची अनामत रक्कम जप्त झाली आहे.

या अनामत रक्कम शासनजमा झालेल्या उमेदवारांमध्ये बसपचे डॉ.मोहन राईकवार-२० हजार ७९५ मते, अक्षय मेहरे-५ हजार ४६७, आशिष ईझनकर-१ हजार ८२८, उमेश वावरे-१ हजार २४६, कृष्णा कलोडे-१ हजार ६१, कृष्णा फुलकरी-१ हजार ३४३, दिक्षीता आनंद-७३६, मारोती उईके-४ हजार ६७२, डॉ.रामेश्वर नगळारे-७९७, प्रा.राजेंद्र साळूंखे-१५ हजार ४९२, रामराव घोडस्कर-१ हजार ४३८, अनिल घुसे-१ हजार ९७१, अरविंद लिल्लोरे-१ हजार ४७६, आसिफ – १५ हजार १८२, किशोर बाबा पवार-१२ हजार ९२०, जगदीश वानखेडे-२ हजार ३४९, पुजा पंकज तडस-२ हजार १३५, भास्कर नेवारे-४ हजार ३२, रमेश सिन्हा-७९९, राहूल भोयर-६८९, विजय श्रीराव-१ हजार ७३८, सुहास ठाकरे-७ हजार ६४८.

आणखी वाचा-कृषी विकासासाठी यंदा ३०२ शिफारस! राज्यातील चारह कृषी विद्यापीठांच्या संयुक्त कृषी संशोधन व विकास समितीची बैठक

विजयी उमेदवार असलेले राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अमर काळे तसेच भाजपचे उमेदवार रामदास तडस या दोघांच्याच अनामत रक्कम शासन जमा होणार नाही. कारण त्यांनी अपेक्षित मतांपेक्षा अधिक मते प्राप्त केली आहेत. अमर शरद काळे यांना ५ लाख ३३ हजार १०६ मतं तर भाजपचे रामदास चंद्रभान तडस यांना ४ लाख ५१ हजार ४५८ मतं प्राप्त झाली. या दोघांनाच त्यांनी भरलेली अनामत रक्कम परत मिळेल.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: 22 candidates deposits have been confiscated as they did not get certain votes in the lok sabha elections pmd 64 mrj