नागपूर : नागपूरमधील रेल्वे स्थानक मार्गावरील गणेश टेकडी उड्डाणपूल पाडकाम जवळजवळ पूर्ण होत आले आहे. पुलाचा शेवटचा ४७ वा खांब तोडण्यात आला. आत्तापर्यंतच्या पुलाच्या पाडकामातून २२ हजार मेट्रिक टन मलबा निघाला असून त्याची योग्य विल्हेवाट लावण्यात येत आहे.
उड्डाणपुलाच्या जागेवर सहापदरी रस्ता बांधणीचे नियोजन आहे. महामेट्रोने कंत्राटदार कंपनीला पूल तोडण्याचे काम दिले होते. त्यासाठी १५ दिवसांचा वेळ देण्यात आला होता. परंतु निर्धारित वेळेत काम पूर्ण झाले नाही. पाडकामातून निघालेला मलबा एका गो-शाळेने परिसर समतल करण्यासाठी घेतला आहे.