लोकसत्ता टीम

अमरावती: डिजिटल युगाने आपल्यासोबत अनेक फायदे आणि सुविधा आणल्या आहेत, परंतु फसवणूक करणारे आणि घोटाळे करणाऱ्यांना मोठी संधी देखील मिळवून दिली आहे. अमरावतीत खासगी नोकरी करणाऱ्या ३३ वर्षीय व्‍यक्‍तीची २३ लाख रुपयांनी फसवणूक करण्‍यात आली. येथील अलहिलाल कॉलनीत राहणारे तक्रारदार खासगी नोकरी करतात. ते गेल्‍या ६ एप्रिलला यु-ट्यूबवर व्हि‍डिओ पाहत असताना त्‍यांना एक जाहिरात दिसली. त्‍यामध्‍ये ऑनलाईन चित्रपट पाहिल्‍यानंतर रेटिंग केल्‍यास बोनस आणि कमिशन मिळेल, असे सांगण्‍यात आले.

Gujarat man on FBI 10 Most Wanted Fugitives list
Crime News : FBIच्या ‘१० मोस्ट वॉन्टेड’ यादीत गुजराती व्यक्तीचं नाव; माहिती देणाऱ्याला मिळणार ‘इतक्या’ डॉलर्सचं बक्षीस
Mahayuti Government
Shiv Sena : महाराष्ट्राला लवकरच तिसरा उपमुख्यमंत्री मिळणार,…
Two people from Hadapsar area have cheated of 28 lakhs by cyber thieves
सायबर चोरट्यांकडून दोघांची २८ लाखांची फसवणूक
Robbery at sister house to play online gambling in Pimpri Pune print news
पिंपरी: पाच एकर जमीन विकून जुगारात हारला; ऑनलाइन जुगार खेळण्यासाठी बहिणीच्या घरी चोरी
district court granted valmik karad get 7 days police custody
‘खंडणीच्या आड आल्याने देशमुख यांची हत्या’; युक्तिवादात विशेष तपास पथकाचा संशय
Investors in Dombivli cheated of 81 lakhs with false promise of 90 bungalow row house project
रो हाऊस प्रकल्पातील गुंतवणुकीतून, डोंबिवलीतील गुंतवणूकदारांची ८१ लाखाची फसवणूक
Shocking video MP: Fraudsters Replace QR Codes Of Several Shopkeepers To Redirect Payment In Their Bank Accounts In Khajuraho
तुम्हीही सगळीकडे QR कोडने पेमेंट करता का? वेळीच सावध व्हा; फसवणुकीचा हा Video पाहून दुकानदारांच्या पायाखालची जमीन सरकेल
Paaru
Video: “देवीआईंनासुद्धा कळायला पाहिजे…”, पारू अनुष्काचे सत्य अहिल्यादेवीसमोर आणणार? मालिकेत ट्विस्ट, पाहा प्रोमो

घरबसल्‍या कमाईची ही संधी असल्‍याचे समजून तक्रारकर्त्‍याने जाहिरातीत दिलेल्‍या लिंकवर क्लिक केले. त्‍यांना नोंदणी करावी लागली. तक्रारकर्त्‍याला चित्रपटांची ३० तिकिटे रेटिंगसाठी मिळाली. रेटिंग दिल्‍यानंतर या व्‍यक्‍तीला पहिल्‍यांदा ८५० आणि दुसऱ्यांदा ३ हजार ५०० रुपये मिळाले. त्‍यानंतर या व्‍यक्‍तीला वेळोवेळी चित्रपटांच्‍या तिकिटांचे सेट उपलब्‍ध करून देण्‍यात आले आणि प्रीपेड टास्‍कच्‍या माध्‍यमातून रेटिंग देण्‍यास सांगण्‍यात आले.

हेही वाचा… अमरावती : ‘तो’ म्हणाला, प्रेम करतो, तिने दिला नकार, नंतर भर वर्गातच..

अज्ञात आरोपीने या व्‍यक्‍तीला चार बँक खाती आणि एका युपीआय आयडीवर रक्‍कम भरण्‍यास सांगितले. बोनस आणि कमिशनच्‍या आमिषापोटी महिनाभर संबंधित आरोपीच्‍या खात्‍यात रक्‍कम जमा करीत गेले, पण परतावा मिळाला नाही. अशा पद्धतीने या व्‍यक्‍तीची एकूण २३ लाख १ हजार ८७७ रुपयांची फसवणूक झाली.

हेही वाचा… सैन्यदल अधिकाऱ्यांच्या गणवेशात होणार बदल

या व्‍यक्‍तीने अखेर सायबर पोलीस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. पोलिसांनी फसवणुकीच्‍या गुन्‍ह्यासह माहिती तंत्रज्ञान कायद्यान्‍वये बँक खातेधारकाच्‍या विरोधात गुन्‍हे दाखल केले.

Story img Loader